ETV Bharat / city

Sharad Pawar: बस अपघाताची चौकशी सुरू, आम्ही दुःखात सहभागी- शरद पवार - Bus Caught Fire in Nashik

आज पहाटे नाशिक जवळ खासगी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात अकरा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला ( Bus Caught Fire in Nashik ) आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया (NCP President Sharad Pawar visit to Nagpur) दिली आहे. यावेळी ते नागपूर येथुन (expressed his views on various issues today) बोलत होते.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Oct 8, 2022, 12:58 PM IST

नागपूर - आज पहाटे नाशिक जवळ खासगी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात अकरा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला ( Bus Caught Fire in Nashik ) आहे. या प्रकरणाची राज्य सरकारच्या वतीने चौकशी सुरू झाली आहे, चौकशीनंतर खरे कारण समोर येईल. जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कार्य करत आहे. घडलेला अपघात ही अतिशय दुःखद बाब आहे. जे गेले आहे, त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आपण सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. असे यावेळी (NCP President Sharad Pawar visit to Nagpur) शरद पवार म्हणाले. आज (expressed his views on various issues today) नागपूर येथे बोलतांना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

निवडणूक आयोगाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा - धनुष्यबाण कुणाचा? या विषयावर आज निवडणुक आयोग निकाल देणार आहे. हा निकाल कोणाच्या बाजुने लागेल असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता, ते म्हणाले की, मला त्यात काही सांगण्याच कारण नाही. निवडणूक आयोग या संदर्भातला निर्णय घेईल. आलेला निर्णय राजकीय पक्षांनी मान्य केला पाहिजे.

सरसंघचालकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया - इतिहासामध्ये सामाजिक विषमतेबाबत जे काही घडलं आहे. तर आज आपल्याला त्याचे पापक्षालन करायची गरज आहे असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हणटले होते. त्याबाबत बोलतांना शरद पवार म्हणाले की, मी पण हे वाचलं आहे. ही समाधानाची बाब आहे. समाजाच्या एका मोठ्या वर्गामुळे काही पिढ्यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या आणि त्याच्या संदर्भातील जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्या घटकांना त्याची जाण व्हायला लागली आहे. ते योग्य वक्तव्य आहे. मात्र नुसतं माफी मागून चालणार नाही. मात्र,पुढे व्यवहारांमध्ये या सगळं वर्गा संदर्भातली दखल कशी घेतो यावर सगळं अवलंबून आहे.

सरकारने निर्णय घेतला आहे - शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, त्यासंदर्भात सरकारने निर्णय घेतलेला निर्णय हा योग्यच असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.