नागपूर - कोरोनाच्या काळात रुग्णांना दवाखान्यात जाऊन लाखो रुपये खर्चून उपचार घ्यावा लागला. यातून जीव वाचत नाही तेच म्युकर मायकोसिसने ग्रासले. नागपुरात म्युकर मायकोसीवरचा खर्च म्हणजेच दीड कोटी रुग्णालयाचे बिल देऊन जीव विकत घ्यावा लागला, अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. म्युकर मायकोसिसवरील 13 शस्त्रक्रिया आणि औषध उपचाराचे बिल हे दीड कोटीच्या घरात जाऊन पोहचले. नवीन पाल असे या रुग्णाचे नाव आहे.
नवीन पाल हे सरकारी कर्मचारी आहेत. तर त्यांची पत्नी रेल्वे विभागात कार्यरत आहे. नवीन पाल हे सध्या आठ महिन्याच्या उपचारानंतर घरी पोहचले आहे. त्यांना म्युकर मायकोसिस झाल्याचे निदान व्हायला विलंब झाला. त्यामुळे त्यांना एक डोळा आणि दात गमावाले लागले. यासाठी त्यांना तब्बल एक कोटी 48 लाखांचा खर्च आला आहे.
हेही वाचा- म्यूकरमायकोसिसचा डोळ्यांवर गंभीर परिणाम; कशामुळं अन् कोणाला होतो; काय काळजी घ्यावी?
नविन पाल यांना सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ते घरी आले. यानंतर त्यांना डोळ्याचा त्रास जाणवायलाया लागला. तोपर्यंत पोस्ट कोव्हीडमध्ये म्युकर होत असल्याचे कुठेच समोर आले नव्हते. नागपूर- हैदराबाद-नागपूर असा प्रवास करत ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन आठवडे निघून गेलेत. अखेर 22 नोव्हेंबरला मुंबईत पोहचल्यावर हिंदुजा रुग्णलयात त्यांना म्युकर मयकोसिस झाल्याचे निदान झाले आणि इथेच उपचार सुरू झाले. या दवाखान्यात तीन शास्त्रकिया झाल्यात. दररोज इंजेक्शन आणि गोळ्यासाठी लागणारे पैशांचा खर्च पाहता त्यानी नागपूरला जाऊन उपचार घेण्याचे ठरवले.
नागपुरात येऊन त्यांची पत्नी रेल्वेत असल्याने रेल्वे विभागाशी संलग्नित रुग्णलायत उपचार घेण्याचे ठरलेत. यात पाल यांच्यावर नागपुरात मेडीट्रीना रुग्णलायत डिसेंबर महिन्यात उपचार सुरू करण्यात आले. यात नवीन पाल यांच्या डोळ्याजवळ संसर्ग वाढल्याने डोळा काढण्याची वेळ आली. पण जीव वाचत असेल तर त्यालाही त्यांनी आनंदाने होकार दिला. प्रत्येक शास्त्रक्रियेत त्यांचा जबड्या डोळ्याजवळच भाग काढण्यात आला. यात अखेर योग्य उपचार प्रक्रिया पार पडल्याने नवीन यांना नवं आयुष्य मिळाले.
सरकारी नोकरीची मदत आणि कुटुंबीयांसह मित्रांनी दिला धीर..
या आजारात सर्वाधिक त्रासदायक म्हणजे आर्थिक खर्च. कारण दिवसाला हजारो रुपयाचे इंजेक्शन गोळ्या लागतात. नवीन यांना एक लाख रुपये किमतीचे दररोज चौदा इंजेक्शन द्यावे लागत. या उपचारात 1 कोटी रुपये शासकीय नौकारीत असल्याने मदत मिळली. तर 48 लाख रुपये ज्यामध्ये सोनं दागिने, कर्ज, पीएफ, कुटुंबीय मित्रा मंडळींनी मदत केल्याने गोळा झाले. या कठीण काळात नवीन पाल यांच्या पत्नी संगीता यांनी त्यांची दिवस-रात्र सेवा केली. त्यामुळे दोघांच्या आयुष्यातील सर्वात दुःखद काळ निघून गेला. नवे आयुष्य मिळाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसून येतो.