ETV Bharat / city

मोदी सरकारच्या राजवटीत देश पन्नास वर्ष मागे - नाना पटोले

काँग्रेसच्या वतीने आजपासून पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसच्या देवडिया भवनातून नाना पटोलेंनी हिरवी झेंडा दाखवला. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या समस्या मांडणे हा या यात्रेमागील मुख्य हेतू आहे.

Nana patole
Nana patole
author img

By

Published : Nov 14, 2021, 5:14 PM IST

Updated : Nov 14, 2021, 5:24 PM IST

नागपूर - मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पन्नास वर्षे देश मागे गेला आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. गरीब माणूस संपायला निघाला आहे. संविधान धोक्यात आले आहे हीच परिस्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी गावागावात जाऊन जनजागरण यात्रा काढली जाणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत. ते नागपूरात देवडिया भवन येथे माध्यमांशी बोलत होते.

बिघडलेली अवस्था जनतेसमोर मांडू

काँग्रेसच्या वतीने आजपासून पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात जनजागरण यात्रा सुरू करण्यात आली आहे. याला काँग्रेसच्या देवडिया भवनातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हिरवा झेंडा दाखवला. रिझर्व बँकेचे गव्हर्नर दर सहा महिन्याने का बदलतात सगळ्या गोष्टी या पदयात्रेच्या जनजागरण मोहिमेद्वारे मांडणार असल्याचेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस विजयी होईल

जेव्हा उत्तरप्रदेशच्या निवडणुका येतात, तेव्हा भाजपच्या वतीने हिंदू-मुस्लीम यांचे भांडण लावून उत्तर प्रदेश निवडणुका जिंकण्याचा अजेंडा असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम केले जाते. बिहारची निवडणूक असतांना सुशांतसिंग प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या आहे. आता त्रिपुरा राज्यात घडलेली घटनेचे पडसाद महाराष्ट्रात पडत आहे. पण जनता भीक घालणार नसून उत्तर प्रदेशात भाजप पराभूत होवून आणि काँग्रेस विजयी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Janjagaran yatra
काँग्रेसची जनजागरण यात्रा

हेही वाचा - प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी यांनी कंगनाला शिकवला स्वातंत्र्याचा धडा

मित्रपक्षापासून सावध राहा. नानाचा सल्ला..
गोंदीयामध्ये काँग्रेसला मित्रपक्ष सुपारी घेऊन बदनाम करते असल्याचे व्यक्तव्य केले. यावर प्रश्न विचारला असता मात्र पक्षाबद्दल नाही बोललो सुपारी हा शब्द वापरला नाही. तर मित्रापासून सुद्धा सावध राहा अस म्हटले होते. ही भाषा आमच्या लोकांना कळली तुम्हाला नाही कळणार असेही म्हणालेत. राष्ट्रवादी विदर्भात फार नाही हे विदर्भातील जनतेने वारंवार सांगिलेले आहे. राष्ट्रवादीचे दुकान नाही असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

अफवा पसरवणे भाजपची प्रवृत्ती
अमरावतीच्या घटनेबद्दल विचारले तेव्हा नाना म्हणाले आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो की, अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यामुळे त्यावादात न पडता महाराष्ट्र मध्ये शांतता ठेवा. अफवा पसरवने ही भाजपची प्रवृत्ती आहे असाही आरोप नाना पटोले यांनी केला.

या घटनेमागे भाजप - काँग्रेसचा आरोप
महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे का यावर विचारले असता पटोले म्हणाले महाराष्ट्रातून भाजपची पहाटेची सरकार गेली, तेव्हापासून पहाटेचे सोडून दिवसा स्वप्न बघतात. सत्ता गेल्यापासून भाजप किती चिडले आहे हे आपण पाहिले आहे. जातिवाद निर्माण करून, हिंदू मुस्लिम भांडण लावले जात आहे. या सगळ्या घटनेमागे भाजप पाठीशी आहे, पण जनता भीक टाकणार नाही असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Janjagaran yatra
महागाईच्या विरोधात काँग्रेसची यात्रा

नागपूरची विधानपरिषदेची जागा काँग्रेस जिंकणार

यंदाची विधान परिषदेची निवडणूक आम्ही जिंकू, लवकरच सक्षम उमेदवार विधानपरिषदेचा देऊ, आणि नागपूरची विधानपरिषदेची जागा काँग्रेस जिंकेल असाही विश्वस त्यांनी बोलून दाखवला आहे. महाराष्ट्र पोलीसानी चांगले काम केले आहे. नक्षली मोहिमेला थांबवण्यात चांगले यश मिळाल्याने त्यांना शुभेच्छा आहे.

हेही वाचा - Rain for the next A few days - पुढील काही दिवस राज्यात पाऊस, हवामान विभागाची माहिती

Last Updated : Nov 14, 2021, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.