ETV Bharat / city

राज्य सरकारने केलेल्या कामावर टीका करण्याचा भाजप नेत्यांना जॉब - नाना पटोले - नाना पटोले मोदी सरकार टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की केंद्राकडून कशी अधिक मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना अधिक मदत देता येईल याकडे भाजप नेत्यांनी लक्ष घालावे. तसे केल्यास अधिक मदत करता येईल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. राजनाथ सिंह यांनी सावरकर यांच्या माफीवरून केलेल्या विधानावरूनही पटोले यांनी भाजपला टोला लगावला.

नाना पटोले
नाना पटोले
author img

By

Published : Oct 14, 2021, 3:34 PM IST

नागपूर - राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून 10 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. असे असताना भाजप नेते टीका करण्याचे काम करत आहेत. 15 हजार कोटीचे नुकसान होऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मदत करण्याची केंद्र सरकारची जबाबदारी होती. पण ते सोडून भाजपने टीका करत आहे. टीका करणे हा भाजप नेत्यांचा जॉब असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेश समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की केंद्राकडून कशी अधिक मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना अधिक मदत देता येईल याकडे भाजप नेत्यांनी लक्ष घालावे. तसे केल्यास अधिक मदत करता येईल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते माध्यमांशी नागपुरात त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.

सरकारने केलेल्या कामावर टीका करण्याचा भाजप नेत्यांना जॉब

हेही वाचा-भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निधी मिळवू-

कोरोनामुळे राज्य सरकारकडे उपलब्ध आर्थिक स्रोतातून ही मदत करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात आर्थिक स्रोत सुधारल्यानंतर आणखी मदत करावी, अशी मागणी काँग्रेस करणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ओबीसी मंत्री नाराज असल्याचे कळले आहे. यावर बोलताना म्हणाले की, मी स्वतः मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी बोलणार आहे. दबाव आणून भटक्या विमुक्त जातींना निधी मिळावा हीच भूमिका असेल. त्यासाठी प्रयत्न करू असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

हेही वाचा-BREAKING : मलिक यांचे जावई समीर खान यांना जामीन मंजूर, एनसीबी उच्च न्यायालयात जाणार

दिवास्वप्न पडणे बरोबर नाही, फडणवीसांना टोला...
मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच म्हटले. त्यावर नाना पटोले म्हणाले, की देवेंद्र फडणवीस हे आमचे मित्र आहेत. फार काही बोलावे असे नाही. पण त्यांनी पहाटे स्वप्न पडल्यानंतर 80 तासांचे सरकार बनवले होते. पण दिवास्वप्न पडते, हे काही बरोबर नाही म्हणता टोला लगावला.

हेही वाचा-रक्ताने अभिषेक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक, भक्ताने केला भांडाफोड

महिलांचा अपमान कोणीच करू नये....
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रावणाला मदत करणाऱ्या शूर्पणखेला महिला आयोगाचे अध्यक्षपद देऊ नका, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, एका महिलेने दुसऱ्या महिलेचा अपमान करावा हे बरोबर नाही. आपल्या समाजात महिलांचे स्थान मोठे आहे. त्यामुळे महिला असो की पुरुष कोणीच अपमान करू नये, अशी भूमिका काँग्रेसची असल्याचे पटोले म्हणाले.

सावरकरांना इंग्रजांकडून साठ रुपयांची पेन्शन मिळत होती-
वि. दा. सावरकर यांना महात्मा गांधींच्या सूचनेनुसार इंग्रजांकडे माफी मागितली असावी, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केले होते. त्यावर नाना पटोले म्हणाले, की खरेतर चीन आपल्या देशावर आक्रमण करण्याचा तयारीत आहे, तसे त्यांनी घोषित केले आहे. त्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिकडे लक्ष द्यावे. ते सावरकरांच्या अनुयायी असल्याने त्यांना त्यांचा इतिहास चांगला माहीत आहे. सावरकर यांनी 1911 मध्ये इंग्रजांकडे माफी मागितली. त्यांना साठ रुपये पेन्शनसुद्धा लागू झाली होती. त्या काळात महात्मा गांधी हे आफ्रिकेत स्वातंत्र्याची लढाई लढत होते. त्यानंतर गांधीजी 1915 मध्ये भारतात आले. पण मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे त्या काळात कॅमेरे आणि मोबाईल असेल. अथवा त्यांचे सावरकर यांच्याशी बोलणे झाल असेल तर आम्हाला माहित नाही. ते आमच्या रेकॉर्डवर नाही. पण मूळ महागाई, बेरोजगारी, या विषयावरून लक्ष हटवण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री बोलतात. असे बोलत असले तर योग्य नाही. त्यांच्यांवर लोकांचा विश्वास आहे. मोदी-शाह हे खोटे बोलतात. पण त्यांनी तसे बोलू नये, असेही नाना पाटोले यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.