नागपूर - कोरोनाच्या काळात टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. यात पहिल्या लाटेत लॉकडाऊन झाल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी टॅक्सी व्यवसाय सुरू होता. मात्र, दुसऱ्या लाटेत प्रवासी वाहतुकीस परवानगी न दिल्याने या व्यवसाला मोठा फटका बसला आहे. उपराजधानी नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात टॅक्सी व्यवसाय चांगला चालतो. पण यंदाच्या लॉकडाऊनमध्ये येथील टॅक्सी व्यवसाय ठप्प झाला आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या टॅक्सी चालकांच्या परिस्थितीचा आढावा घेणार ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...
दुसऱ्या लाटेत वाहनांची चाके थांबली उपराजधानी नागपूर हे देशाचे मध्यस्थान असलेले शहर आहेत. विदर्भात नागपूर शहराला पर्यटनाच्या दृष्टीने टायगर कॅपिटल म्हणून ओळखले जाते. नागपूर हे पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वाचे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. याचा येथील टॅक्सी व्यवसायाला चांगला फायदा होतो. मात्र, कोरोना काळात लॉकडाऊमुळे येथील टॅक्सी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी कोरोनाकाळात थोडाफार दिलासा या टॅक्सी चालकांना मिळाला होता. मात्र यंदाच्या लॉकडाऊनमध्ये टॅक्सी व्यावसायिकांचे अर्थचक्राला ब्रेक लागला आहे. त्यामुळे तब्बल ४० कोटींचा फटका या व्यवसायाला बसला आहे.
दुसऱ्या लाटेत वाहनांची चाके थांबली टॅक्सीची बुकिंग बंदच;जवळपास 8 हजार टॅक्सी उभ्याच...नागपुरात सध्या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. परिणामी शहरातील प्रवासी सेवा देणाऱ्या टॅक्सी व्यवासायही ठप्प झाला आहे. नागपूर शहरात मेडिकल हब म्हणून सुद्धा पाहिले जाते. त्यामुळे वैद्यकीय सेवा घेण्यासाठी नागरिक सध्या रस्त्यावर दिसत आहेत. त्यामुळे मोजक्यात टॅक्सी रस्त्यावर दिसून आहे. शहरात ऑल इंडिया परमिट असलेल्या साधारण 9500 पेक्षा जास्त टॅक्सी नागपुरात आहेत. ज्या शहर आणि शहराबाहेर सेवा देतात. पण सध्याच्या घडीला एक हजारापेक्षा जास्त वाहने रस्त्यावर नसतील, असे संगितले जात आहे. यामुळे बहुतांश टॅक्सी या टॅक्सकंपनी किंवा घरासमोर बंद स्थितीत उभ्या आहेत. यामुळे मोठा आर्थिक भुरडदं महिन्याला सहन करावा लागत आहे.
दुसऱ्या लाटेत वाहनांची चाके थांबली रोडटॅक्स आणि इन्शुरन्समध्ये सवलत मिळावी...पहिल्या लाटेत लॉकडाऊन झाले तेव्हा वाहन कर्जाचे हप्ते, परिवहन विभागाकडून सहा महिन्यांचा रोड टॅक्स यामध्ये सवलत देण्यात आली होती. तशाच प्रकारची सवलत या लॉकडाऊनमध्येही द्यावी, अशी मागणी येथील टॅक्सी व्यवासायिकांनी केली आहे.
ऑनलाईन पद्धतींचा अवलंब वाढल्यानेही फटका...
नागपूर जिल्ह्यात मेडिकल कॉन्फरन्स मोठ्या प्रमाणात होतात. याचे नियोजन वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून केले जाते. या कॉन्फरन्ससाठी बाहेरील डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, व्यावसायिक हे बाहेर राज्यातून येत असत. मात्र, आता कोरोना काळात अशा प्रकारच्या परिषदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडत असल्याने नागपुरात येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचाही परिणाम टॅक्सी व्यवसायावर झाला असल्याचे पाहायला मिळते.
दुसऱ्या लाटेत वाहनांची चाके थांबली आर्थिक अडचणीतून जातांना कर्मचाऱ्यांचे पगार देण्यास अडचणीमिलिंद देशकर यांच्या टॅक्सी अँड टुरिस्ट कंपनीकडे साधारण 70 विविध प्रकराच्या टॅक्सी आहेत. मात्र आजघडीला केवळ १० ते १२ वाहने रस्त्यावर धावत आहेत. अशा परिस्थितीत इतर वाहनांवरील चालकांचे आणि इतर कर्मचाऱ्याचे पगार करण्यास अडचण निर्माण होते. तसेच सरकारी यंत्रणेला भाड्याने देण्यात आलेल्या वाहनांची सुविधा देखील या काळात बंद आहे. त्यामुळे तिकडून येणारे उत्पन्नही घटले असल्याचे मिलिंद देशकर यांनी सांगितले.
नागपुरात 40 कोटीची उलाढाल ठप्प...पहिल्या लाटेत काही टॅक्सी चालक-मालकांचे नुकसान झाले. मात्र नंतर लॉकडाऊन शिथील झाल्यावर ते भरूनही निघाले. मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. यामुळे एकट्या नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 40 कोटीची उलाढाल या दोन महिन्यात ठप्प झाली आहे.