ETV Bharat / city

गडकरींच्या आवाहनानंतर दुबईतील नागपूरकरांचा मदतीचा हात, मिळणार 650 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

गडकरींच्या आवाहनाला थेट दुबईतील नागपुरकरांनी प्रतिसाद दिला आहे. दुबईत राहणारे मुळचे नागपूरकर असलेले डॉ. संजय पैठणकर यांनी दुबईतील भारतीय मित्रांच्या मदतीने नागपूर शहराच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

गडकरींच्या आवाहनानंतर दुबईतील नागपूरकरांचा मदतीचा हात

author img

By

Published : May 10, 2021, 9:00 AM IST

नागपूर : नागपुरात कोरोनाचे थैमान सुरू असताना मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा कमी पडू लागल्यात. या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी समाजातील दानशुरांना मदतीचे आवाहन केले. याला दुबईतील नागपुरकरांनी सकारात्मक प्रतिसाद देत 400 ऑक्सिजन सिलिंडरसह 650 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची मदत पाठविण्याची व्यवस्था केली आहे.

गडकरींच्या आवाहनानंतर दुबईतील नागपूरकरांचा मदतीचा हात

नितीन गडकरींच्या आवाहनाला प्रतिसाद
कोरोनाच्या संकटात रुग्णालयांत बेड तसेच रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याच्या घटना देशभरात समोर येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागपूरसह विदर्भाला त्राही त्राही करून सोडले आहे. रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोर्चा सांभाळात समाजातील दानशूरांना मदतीचे आवाहन केले होते. गडकरींच्या आवाहनाला थेट दुबईतील नागपुरकरांनी प्रतिसाद दिला आहे. दुबईत राहणारे मुळचे नागपूरकर असलेले डॉ. संजय पैठणकर यांनी दुबईतील भारतीय मित्रांच्या मदतीने नागपूर शहराच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

650 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मिळणार

पैठणकर यांनी त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने नागपूरसाठी चीनहून 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची पहिली खेप पाठविण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय आणखी 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स तसेच 400 ऑक्सिजन सिलिंडरही जहाजाने रवाना केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नितीन गडकरींच्या आवाहनानंतर नागपूरला थेट दुबईतून मदतीचा हात मिळाल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.