ETV Bharat / city

Nagpur : पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थिनींचे प्राध्यापकावर गंभीर आरोप, विद्यापीठाने नेमली चौकशी समिती

author img

By

Published : Mar 14, 2022, 10:22 PM IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ( Sant Tukdoji Maharaj Nagpur University ) पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी एका प्राध्यापकांवर मानसिक ( Nagpur University Student Alligation On Professor ) छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाही, तर प्राध्यापकाने आर्थिक छळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Nagpur University
Nagpur University

नागपूर - विद्येचे मंदिर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ( Sant Tukdoji Maharaj Nagpur University ) पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी एका प्राध्यापकांवर मानसिक ( Nagpur University Student Make Alligation On Professor ) छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाही, तर प्राध्यापकाने आर्थिक छळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यासंदर्भात विद्यार्थिनींनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. यावर विद्यापीठाकडून निवृत्त न्यायमूर्ती मीरा खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

पीएचडीसाठी संशोधन आणि विषयाचा आराखडा सादर करण्यासाठी हिंदी विभागातल्या प्राध्यापकाने जाणीवपूर्वक मानसिक आणि आर्थिक छळ केला. त्याचबरोबर सतत अपमानास्पद वागणूक दिल्याचा तक्रार पत्रात म्हटल आहे. तक्रार करणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या हिंदी विभागातील संशोधन केंद्रावर पीएचडीसाठी आपल्या विषयाचा आराखडा रीतसर सादर केलेला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या हिंदी विभागातील प्राध्यापकाने विनाकारण मानसिक छळ सुरू केला, असे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. 7 मार्च रोजी रीतसर तक्रार या विद्यार्थिनी कुलगुरूकडे केल्यानंतर अद्यापपर्यंत प्राध्यापकांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

विद्यापीठाने नेमली चौकशी समिती -

सात दिवसांपूर्वी दोन विद्यार्थिनींनी कुलगुरू यांना भेटून तक्रार अर्ज दाखल केला होता. कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी त्यांच्या तक्रार अर्जावर कोणताच निर्णय घेतला नव्हता. आज अखेर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मीरा खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती मीरा खडक्कार, माजी प्राचार्य डॉ. वंदना खुशलानी, माजी प्राध्यापक डॉ. मिथिलेश अवस्थी आणि विधी अधिकारी अनुजा कुलकर्णी यांच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सिनेटमध्ये मुद्दा उपस्थित -

नागपूर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे यांनी सिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी ती तक्रार कुलगुरुंकडे पाठवली होती; परंतु आठवडा उलटून गेल्यानंतर सुद्धा विद्यार्थिनींचा लैंगिक आणि आर्थिक छळ करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई नागपूर विद्यापीठाने केली नाही. मात्र, आता हा विषय मीडियात आल्यानंतर विद्यापीठाने चौकशी समिती नेमली आहे.

हेही वाचा - 12th Math Statistic Paper Leak : बारावी परीक्षेचा पुन्हा पेपर फुटला; गणित आणि संख्याशास्त्र पेपर व्हाट्सअॅपवर व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.