नागपूर - आज नागपूर हे विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. नागपुरात आज ४६.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या सहा दिवसांपासून नागपुरातील तापमान सतत ४६ अंशांच्या वरच नोंदवण्यात येत आहे. या सोमवारी तर नागपुरात ४७ अंश सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर तापमानात शून्य पूर्णांक 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाचा पारा वर खाली होतो आहे.
नागपूर खालोखाल चंद्रपूर येथे कमाल ४६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या 6 दिवसांपासून विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा सूर्याचा प्रकोप बघायला मिळत असला तरी आज मात्र, तापमानात काहीशी घट नोंदवण्यात आली आहे. पुढील काही दिवस उष्णतेचा प्रकोप असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा विदर्भाने सूर्याचा कोप सहन केला आहे. पुढील काही दिवसांमध्ये नागपूरसह विदर्भात पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
विदर्भातील प्रमुख शहरांचे आजचे तापमान -
- अकोला - 44.2
- अमरावती - 43.6
- बुलडाणा - 40.6
- चंद्रपूर - 46.0
- गडचिरोली - 44.2
- गोंदिया - 43.3
- नागपूर - 46.3
- वर्धा - 45.5
- वाशिम - 43.0
- यवतमाळ - 45.3