नागपूर - सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज रेशीमबागेत रक्षाबंधन साजरे केले आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या भगिनींनी सरसंघचालक मोहन भागवत याना रक्षा सूत्र बांधून रक्षाबंधन साजरे केले.
विश्व हिंदू परिषदेच्या भगिनींनी सरसंघचालकांना बांधले रक्षा सूत्र
देशात आज 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. त्या सोबतच आज रक्षाबंधन देखील आहे. याचेच औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी रक्षाबंधन साजरे केले आहे. मोहन भागवत यांनी महाल येथील मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपून रेशीमबागेत विश्व हिंदू परिषदेच्या भगिनींकडून रक्षा सूत्र बांधून घेतले.