नागपूर - सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सामान्य लोक हैराण झाले आहे. रोज वाढत्या पेट्रोल दराने खिशाला चाप बसत आहे. केंद्राच्या बजेटकडून आशा असताना निराशा झाली. तेच राज्यसरकार तरी अर्थसंकल्पात विचार करेल, अशी आशा असताना त्यात निराशा झाल्याचे सांगितले जात आहे. पण सामान्य नागरिकांना काय वाटतेय, हे ईटीव्हीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
दैनंदिन कामासाठी बाहेर पडावे लागतेच. कामाचा शोधात फिरताना रोजच्या खर्चात वाढ झाली आहे. महागाई वाढत असताना तेवढ्याच पगारात काम करायचे, कसे असा प्रश्न समोर येत आहे. 10 ते 12 हजारांत काम करताना घर कसे चालवावे, असा प्रश्न पडल्याचा कारण खर्च वाढला आहे.
लोकांची मानसिकता झाली आहे
जरी आज पेट्रोल 98 रुपये लिटर असले तरी लोकांची पेट्रोल 100 रुपये लिटर विकत घेण्याची मानसिकता झाली आहे. कारण विरोध करायला कोणीही तयार नाही. विरोध करणारे आता सत्तेत आहे. यामुळे नागरिकांनी पेट्रोल मिळेल त्या किमतीत विकत आणि वाहन चालवायचे अशी मानसिकता करून घेतली असल्याचे मत ईश्वर माथने यांनी सांगितले आहे.