ETV Bharat / city

'फ्लावर नही, फायर है नागपुर पोलिस'..लक्षवेधक ट्विटच्या माध्यमातून पोलिसांनी सुरू केली जनजागृती - जनजागृती ट्विट नागपूर पोलीस

दैनंदिन जीवनात लोकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ट्विटरचा ( Nagpur Police pushpa movie dialogue tweet ) अतिशय योग्य उपयोग सुरू केला आहे. नागपूर पोलिसांनी नुकतेच केलेल्या एका ट्विटची संपूर्ण नागपुरात चर्चा सुरू झाली आहे. सायबर गुन्हेगार विविध लिंक पाठवून लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याच्या घटना वाढत असल्याने नागपूर पोलिसांनी पुष्पा चित्रपटाच्या पोस्टरचा आधार घेत जनजागृती सुरू केली आहे.

nagpur police pushpa movie dialogue tweet
पुष्पा डायलॉग नागपूर पोलीस
author img

By

Published : Feb 19, 2022, 6:52 PM IST

Updated : Feb 21, 2022, 4:22 PM IST

नागपूर - आगळे - वेगळे आणि तेवढेच लक्षवेधक ट्विट ( Nagpur Police pushpa movie dialogue tweet ) करून लोकांची जनजागृती करण्याचा प्रयत्न नागपूर शहर पोलीस नेहमीच करत असते. ज्वलंत विषयाला अनुसरून नागरिकांना विविध गुन्हेविषयक माहिती देऊन त्यांचे गुन्हा घडण्यापासून संरक्षण करण्याचे काम नागपूर पोलीस ट्विटरच्या माध्यमातून करत आहे. दैनंदिन जीवनात लोकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ट्विटरचा अतिशय योग्य उपयोग सुरू केला आहे. नागपूर पोलिसांनी नुकतेच केलेल्या एका ट्विटची संपूर्ण नागपुरात चर्चा सुरू झाली आहे. सायबर गुन्हेगार विविध लिंक पाठवून लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याच्या घटना वाढत असल्याने नागपूर पोलिसांनी पुष्पा चित्रपटाच्या पोस्टरचा आधार घेत जनजागृती सुरू केली आहे.

माहिती देताना पोलीस आयुक्त

हेही वाचा - Video : कोरोनानंतर शिवजन्मोत्सवाला भव्य स्वरूप , नागपुरात ढोल-ताशाच्या गजरात मानवंदना

देशभरात पुष्पा चित्रपटाच्या गाण्यांची आणि डायलॉगची धुमाकूळ

पुष्पा चित्रपटाची गाणी आणि डायलॉग अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. तरुण वर्गात तर पुष्पाची भलतीच क्रेज असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जिकडे तिकडे पुष्पाचा गजर सुरू असल्याने नागपूर पोलिसांनीसुद्धा लोकांची जनजागृती करण्यासाठी पुष्पाचीच मदत घेतली आहे. पुष्पा नाम सूनके फ्लॉवर समजा क्या, फायर है मै, याच बरोबर 'मै झुकेगा नही', या अजरामर झालेल्या डायलॉगच्या मदतीने नागपूर पोलिसांनी सायबर गुन्ह्यांपासून लोकांना वाचवण्यासाठी पुष्पाच्या फोटोवर 'मी ती लिंक उघडणार नाही' असे नमूद करून पुष्पाके पोस्टर ट्विट केले आहे. नागपूरकरांना हा फोटो भलताच आवडला असून, त्यावर लाईक्सचा पाऊस पडतो आहे. नागरिक सायबर गुन्ह्याला बळी पडू नये या करिता नागपूर पोलिसांनी जनजागृतीसाठी भन्नाट ट्विट केले असल्याचे मत शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केले.

एका पेक्षा एक भन्नाट ट्विट -

०१) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागपूरमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांना मनाई करण्यात आली होती. तेव्हा काहींनी विचारले होते, आम्ही पार्टी कुठे करायची? तेव्हा त्याला उत्तर देताना नागपूर पोलिसांनी मिश्किल ट्विट केले होते, थर्टी फर्स्टची पार्टी कुठे? आम्ही तुमच्यात सामील होऊ का? असा सवाल नागपूर पोलिसांनी ट्विटरवरून विचारला होता.

०२) चंद्रयान 2 या मोहिमेत पाठवलेल्या लँडर विक्रमचा इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला होता. इस्रोच्या विक्रम लँडरबद्दल नागपूर पोलिसांनी मजेदार ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये पोलिसांनी म्हटले की, “डिअर विक्रम, कृपया रिस्पाँड कर. आम्ही सिग्नल ब्रेक केल्याबद्दल तुला दंड आकारणार नाही. यानंतर अनेकांनी मोठ्या संख्येने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

०३) लोकप्रिय चित्रपट अभिनेता रणवीर सिंग याने एका गाण्यातील ओळी स्वतःच्या फोटोला कॅप्शन म्हणून वापरल्या होत्या. 'वॉट इज मोबाईल नंबर ? वॉट इज यूआर स्माइल नंबर?, वॉट इज यूआर स्टाइल नंबर ? करू क्या डायल नंबर ?' या गाण्याच्या ओळी कॅप्शन म्हणून पोस्ट केल्या होत्या. यावर नागपूर पोलिसांनी 100 नंबर असे ऊत्तर दिले होते, याला सुद्धा नेटकऱ्यांनी जोरदार पसंती दिली होती.

०४)कोरोनाच्या दहशतीच्या काळात लोकांना धीर देण्यासाठी नागपूर पोलिसांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगचा आधार घेतला होता. ‘जबतक ये खेल खतम नहीं होता, अपुन इधरिच है’ महानायकाचा हाच अंदाज अन डायलॉग नागपूर पोलिसांनी ट्विट केला होता. कोरोनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून घराबाहेर पडण्याची धास्ती निर्माण झाली आहे. या भयावह परिस्थितीला न घाबरता नागपूर पोलिसांनी लोकांच्या सेवेसाठी ‘अपुन इधरिच है’, म्हणत नागरिकांनाही भीतिमुक्त राहण्याचा विश्वास दिला होता.

वेळोवेळी नागपूर पोलीस विषयाला अनुसरून वेगळ्या पद्धतीचे ट्विट करून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा - Hingana Nagar Panchayat : हिंगणा नगरपंचायतमध्ये भाजपाची सत्ता; विशेष सभेत झाली अध्यक्षांची निवड

Last Updated : Feb 21, 2022, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.