ETV Bharat / city

Nagpur Missing Cases : बेपत्ता मुली शोधण्यात नागपूर पोलिसांचा हतकंडा; मुंबईला टाकले मागे - बेपत्ता नागरिकांना शोधण्यात नागपूर पोलीस अव्वल

नागपूर पोलिसांनी 84 टक्के बेपत्ता लोकांना शोधून काढले ( Nagpur Police Found 84 Percent Missing Cases ) आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनात ही कामगिरी केली आहे.

Police Commissioner Amitesh Kumar
Police Commissioner Amitesh Kumar
author img

By

Published : Apr 13, 2022, 4:59 PM IST

नागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींचे घर सोडून ( Minor Girl Missing Cases Increased ) जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यासह इतरही कारणांनी मुलांसह वयस्क लोकांचेही घर सोडण्याचे प्रमाण वाढले. पण, नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( Police Commissioner Amitesh Kumar ) यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेल्या विशेष पथकाच्या कामगिरीने राजधानी मुंबईला मागे पाडत उपराजधानीत चांगली कामगिरी केली आहे. नागपूर पोलिसांनी दाखल प्रकरणात 84 टक्के लोकांना शोधून काढले ( Nagpur Police Found 84 Percent Missing Cases ) आहे.

मानसिक छळ यासह घरगुती वाद यासह अनेक घटना पहाता मागील सहा वर्षात म्हणजेच 2016 ते 2021 मध्ये सुमारे 2800 मुला-मुलींनी घर सोडले आहे. यातच मागील तीन वर्षाच्या कालावधीत 948 मुलींनी घर सोडले आहे. यात अनेक मुला-मुलींना फूस लावण्याचे प्रकार घडत असून, तीन वर्षांच्या कालावधीत 207 मुलेही बेपत्ता झाली. यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मानवी तस्करी प्रतिबंधक पथक स्थापन केले. यासाठी एक महिला पोलीस निरीक्षक म्हणून मंदा मनगटे आणि एपीआय रेखा संकपाळ यांच्यावर पथकाची जबाबदारी दिली. त्यांनीही ती जबाबदारी खुबीने पेलली आहे.

शोधकार्यात मुंबई-पुण्याला टाकले मागे - या पथकानेही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष प्रयत्नातून शोधमोहीम सुरू केली. यात कुठल्याही परिस्थितीत घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू केलेत. याच कामात मोठे यशही पोलीस विभागाच्या या पथकाच्या हाती लागले. त्यामुळे 84 टक्के लोकांना शोधून काढले. हेच प्रमाण पुणे जिल्ह्यात 81 टक्के तर यात मुंबई मागे पडली असून, 72 टक्के हरवलेल्या तक्रारी सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. पूर्वी हेच काम स्थानिक पोलीस स्टेशनच्या पातळीवर होत असत. पण, याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. क्राईम ब्रांचच्या मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने यात 2019 मध्ये 381 मुली बेपत्ता झाल्यानंतर 371 जणांना शोधून काढलेत. 2020 मध्ये 251 पैकी 241 मुलींना शोधून काढलेत. 2021 मध्ये 316 पैकी 231 जणींना शोधून काढले होते. 2021 मध्ये 3 हजार 755 बेपत्ता महिला-पुरुष आणि अल्पवयीन मुला-मुलींपैकी 3 हजार 363 व्यक्तींना शोध घेण्यात यश मिळाले. हेच प्रमाण ८४ टक्के आहे.

घटना कमी होण्यासाठी जनजगृती - बेपत्ता नागरिकांना शोधण्यासाठी क्राईम ब्रांचचे पथक तयार केले आहेतच. यात कंट्रोलरूम मध्ये हेल्पडेस्कच्या माध्यमातून सर्व डेटा एकत्र केला जातो. संबंधित बेपत्ता व्यक्तीचा तो डेटा कुठे मिळतो का हे तपासले जातात. त्यानुसार ग्रामीण आणि शहर यासह लगतच्या पोलिसांच्या स्टेशनच्या हद्दीत सुद्धा बेपत्ता असणाऱयांच्या अनुषंगाने चौकशी केली जाते. तसेच, फूस लावून अल्पवयीन मुलीचे पळून जाण्याचा प्रमाण पाहता पोलीस दीदीच्या माध्यमातूनही रोज शहरात कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जात असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलतांना सांगितले आहे. कम्युनिटी पोलीस म्हणून यावर अधिक भर देऊन या घटना कशा पद्धतीने कमी करता येईल याकडे लक्ष वेधले जात आहे.

दोन घटनांमध्ये घर सोडून केली आत्महत्या - मार्च महिन्यात 18 वर्षीय मुलांसोबत 16 वर्षीय मुलीचे प्रेमप्रकरण जुडले. यात घरचे प्रेमाला विरोध करतील म्हणून हातात हात घेऊन रेल्वेसमोर उडी घेत जीवनयात्रा संपवली. ही घटना ताजी असताना उमरेड तालुक्यातील अल्पवयीन मुला-मुलीने पळून जात प्रेमसबंधातून कुटुंब ऐकणार नाही म्हणून विहरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. यासारख्या अनेक घटना वाढत चालल्या असून, पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवत शोध घेत आपले स्थान उच्च पदावर नेले आहे. तेच पुणे आणि मुंबई या मेट्रो शहरांना मागे टाकले हे विशेष आहे.

हेही वाचा - Sharad Pawar Criticism on Raj Thackeray : प्रबोधनकार ठाकरे हे माझे आदर्श - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.