नागपूर - महामेट्रोतर्फे वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीपर्यंत दर १५ मिनिटांनी ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. मेट्रोचा वेग वाढल्याने प्रवाशांच्या संख्येतदेखील वाढ होण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सीताबर्डी ते जयप्रकाशनगर पर्यंतचा प्रवास आता केवळ ११ ते १२ मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी हा दिवस ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त केली आहे. मेट्रो वाढत्या वेगाने धावावी यासाठी अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टमचा अवलंब करण्यात आला आहे.
हेही वाचा - भामरागडच्या आदिवासींनी पहिल्यांदाच अनुभवली आधुनिक भारताची झलक
आठवड्यात सरासरी चार हजार प्रवासी नागपूर मेट्रोने प्रवास करतात. तर सुट्टीच्या दिवसांमध्ये हा आकडा 12 हजारांपर्यंत जातो. हळूहळू लोकांचा कल मेट्रोकडे वाढू लागल्याने भविष्यात मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असेल, असा विश्वास मेट्रोचे अधिकारी व्यक्त करत आहेत.