ETV Bharat / city

'१५ वर्षात १५ बदल्या.. मुंढे यांनी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊनच पुढील वाटचाल करावी' - Tukaram Mundhe News

मी किंवा कुणीही आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची साधी मागणीदेखील केली नव्हती. मात्र, तो राज्य सरकारचा अधिकार आहे. १५ वर्षात १५ बदल्या होणे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे मुंढे यांनी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊनच पुढील वाटचाल करावी, असे म्हणत महापौरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महापौर संदीप जोशी
महापौर संदीप जोशी
author img

By

Published : Aug 26, 2020, 8:13 PM IST

नागपूर - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही कधीही केली नव्हती. त्यांच्या बदलीमागील कारणांचा उलगडा राज्य सरकारने करावा, अशी मागणी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.

मुंढे यांच्या बदलीची साधी मागणीदेखील केली नव्हती - महापौर

'प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे नागपूरचे महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून २८ जानेवारीला रुजू झाले होते, केवळ ७ महिन्यात त्यांची बदली होणे दुर्दैवी आहे,'असे महापौर संदीप जोशी म्हणाले आहेत. मुंढे यांच्यासोबत वैयक्तिक शत्रूता असण्याचे कोणतेही कारण नव्हते. आयुक्तांनी लोकप्रतिनिधी आणि जनप्रतिनिधींना सोबत घेऊन नागपूर शहराचा विकास साधावा, अशी अपेक्षा होती. मात्र, मी करेल तो कायदा, बाकी माझ्याशिवाय कुणालाही काहीही कळत नाही, अशी त्यांची भूमिका पहिल्या दिवसापासून होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.