ETV Bharat / city

nagpur marbat 2021 : कोरोना नियमांचे पालन करत मारबतीचे दहन - nagpur corona

एरवी लाखोंच्या उपस्थितीत निघणारी मारबत मिरवणूक कोरोना प्रतिबंधामुळे रद्द करण्यात आली. मात्र काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि पोलिसांच्या बंदोबस्तात पिवळ्या मारबतीचे विसर्जन करण्यात आले. मारबत व बडग्या हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपुरातच आहे.

नागपूर मारबत उत्सव
नागपूर मारबत उत्सव
author img

By

Published : Sep 7, 2021, 4:04 PM IST

Updated : Sep 7, 2021, 5:14 PM IST

नागपूर - नागपूरसह विदर्भाची १४१ वर्षांची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरासंपन्न असलेला बडग्या-मारबत उत्सवाला सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाची झळ सहन करावी लागली आहे. एरवी लाखोंच्या उपस्थितीत निघणारी मारबत मिरवणूक कोरोना प्रतिबंधामुळे रद्द करण्यात आली. मात्र काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि पोलिसांच्या बंदोबस्तात पिवळ्या मारबतीचे विसर्जन करण्यात आले.

नागपूर मारबत उत्सव
नागपूर मारबत उत्सव

8 दिवस घेतात दर्शन

जागनाथ बुधवारी येथील पिवळी मारबत आणि काळी मारबत उत्सव समिती नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत आणि सोबत विविध मंडळांचे बडगे या मिरवणुकीत सहभागी होता. तऱ्हाने तेली समाजाच्या १३७ वर्षे जुन्या पिवळी मारबत उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर इतर सर्व समाजाकडून काळी मारबतची स्थापना केली जाते. सुमारे आठ दिवस भाविक दोन्ही मारबतचे दर्शन घेतात. यंदा कोरोनामुळे प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारली. पण पिवळ्या आणि काळ्या मारबतीला श्रद्धेचे स्थान असल्याने दोन्ही मारबतींची निर्मिती करून स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पोळ्याच्या पाडव्याला काळ्या आणि पिवळ्या मारबतीची भव्य मिरवणूक काढली जाते. एका चौकात दोन्ही मारबतींचे मिलन झाल्यानंतर दोन्ही मारबती आपल्या-आपल्या मार्गाने निघून जातात. त्यानंतर परंपरेनुसार पिवळ्या मारबतींचे नाईक तलाव परिसरात दहन करण्यात आले.

नागपूर मारबत उत्सव

सलग दुसऱ्या वर्षी मिरवणूक रद्द

मारबत व बडग्या हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपुरातच आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी मारबत मिरवणूक रद्द करण्यात आली होती, यावर्षी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा धोका असल्याने प्रशासनाने परवानगी बडग्या मारबत मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, त्यामुळे बडग्यादेखील निघाले नाहीत.

बडग्या म्हणजे काय?

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्त समाजातील वाईट चालीरिती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो.

Last Updated : Sep 7, 2021, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.