नागपूर - मोठ्या प्रमाणात वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्या पाहता कडक निर्बंधांचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत कठोर निर्बंध असणार आहेत. यात सकाळी सात ते आठ पर्यंत काही दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. यात स्थानिक प्रशासन आदेश काढणार आहे. जे गोरगरीब लोकं आहेत, छोटे दुकानदार आहे, त्यांच्याही विचार केला जात आहे. लोकांचे जीव वाचवायचे आहेत, पण गरीब लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून याचाही विचार केला जात असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले. ते नागपुरात विभागीय कार्यालयात बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत, दुसऱ्या क्रमांकावर जयंत पाटील
यात पुढे बोलताना म्हणाले की सरकारी नियमावली स्पष्ट सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत जमावबंदीसह सेवा सुरू राहणार आहे. यात रात्री संचारबंदी असणार आहे. लोकांना गर्दी करू नये असे आवाहन केले जात आहे. हे लॉकडाऊन नसून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
मेडिकलच्या परिस्थितीत सुधारणा करू
मेडिकलमध्ये एकाच बेडवर दोन दोन रुग्ण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर बोलतांना पालकमंत्री यांनी सांगितले की, कॅझुलटी वार्डात 75 रुग्णांची व्यवस्था आहे. यात अचानक रुग्ण आल्याने गर्दी झाली 89 रुग्ण एकाच वेळी आले. यावेळी अँटिजेन चाचणीसाठी किमान अर्धा तास लागतो. यासह त्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने आहे ती व्यवस्था करण्यात आली आहे. यात दुरुस्त्या केल्या जात आहे. यात प्रशासन लक्ष देऊन आहे. ऑक्सिजन आणि रेमडीसिवरचा तुटवडा होणार नाही यासाठी पुरवठा उपलब्ध केला जाणार आहे.
हेही वाचा - अनिल देशमुख यांना आता नैतिकता सुचली का? - देवेंद्र फडणवीस