नागपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढतच असून, शुक्रवारी 3,235 नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच, आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक 35 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याचे समोर आले आहे. या मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यात सध्या सात दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे, ज्याचा शुक्रवारी पाचवा दिवस होता. मात्र, रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे पुढे येत आहे. यामुळे प्रशासनाने आणखी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नागपूर जिल्ह्याची परिस्थिती..
नागपूर जिल्ह्यात 16 हजार 66 जनांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात शहरात 2,524 कोरोना बाधित मिळून आले. तेच ग्रामीण भागात 708 जण तर बाहेर जिल्ह्यातील 3 जण असे 3,235 जण बाधित मिळून आले. तेच नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे एका दिवसातील सर्वाधिक ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी शहरात 23, ग्रामीण क्षेत्रात 9 तर बाहेरुन आलेल्या तीन जणांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4,563 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून, 1 लाख 56 हजार 655 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
पूर्व विदर्भाची परिस्थिती..
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात सर्वाधिक बाधित रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात 3 हजार 235 असून 1245 जण कोरोनातून बरे झाले आहे. वर्ध्यात 368, चंद्रपूर 128, भंडारा 107, गोंदिया 47, गडचिरोली 29 असे 3 हजार 914 बाधित मिळुन आले आहे. यात 1 हजार 534 जण कोरोनातून बरे झाले आहे. 35 जणांचा कोरोनाने मृत्यूची झाला आहे. यात पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचा दर 20.1 इतका आहे.
हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात मागील सहा दिवसात 310 नवे कोरोना रुग्ण; तर 5 जणांचा मृत्यू