नागपूर - शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याची नामुष्की महापालिकेवर आली. ही वेळ महापालिकेच्या नियोजनशून्य काराभारामुळे आली, असा आरोप शहर काँग्रेसने केला आहे. पाणी टंचाई विरोधात त्यांनी मटका फोड आंदोलन केले आहे.
ओसीडब्लू कंपनी ही खासगी कंपनी शहराला पाणी पुरवठा करते. पाणी कपात करून देखील भरमसाठ पाणी कंपनीकडून दिले जाते. या कंपनीच्या मनमानी कारभाराला सामान्य जनता त्रासली आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
महापालिकेने योग्य वेळी उपाययोजना केल्या नाहीत, शहरावर पहिल्यांदाच जलसंकट कोसळले याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागतोय, असा आरोप देखील काँग्रेसकडून करण्यात आला.