ETV Bharat / city

नागपुरातील मोमीनपुरासह डोबीनगरातील संभाव्य कोरोना रुग्ण क्वारंटाईन - Mominpura area

मोमीनपुरा भागात राहणाऱ्या २५० नागरिकांना देखील क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मोमीनपुरा भागातील 20 पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शेजारी असलेल्या डोबीनगरात सुद्धा कोरोना रुग्ण आढळून आला आहे.

citizens of Mominpura area will quarantine
नागपूर कोरोना अपडेट
author img

By

Published : May 6, 2020, 10:56 AM IST

Updated : May 6, 2020, 8:29 PM IST

नागपूर - शहरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा शेजारी असलेल्या डोबीनगर भागातील १०० नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मोमीनपुरा भागात राहणाऱ्या २५० नागरिकांना देखील क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मोमीनपुरा भागातील 20 पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शेजारी असलेल्या डोबीनगरात सुद्धा कोरोना रुग्ण आढळून आला आहे.

नागपूरातील मोमीनपुरासह डोबी नगरातील कोरोना संशयितांचे प्रशासनाकडून क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू

हेही वाचा... खडसेंना मिळाले महाजनांचे बळ! म्हणाले, ते आमदार झाले तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करू

नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी यश मिळताना दिसत आहे. मात्र, मोमीनपुरा, सतरंजीपुरा आणि डोबीनगर सारख्या दाटीवाटीच्या भागातून दररोज कोरोना रुग्ण पुढे येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच गेल्या आठवड्यात सतरंजीपुरा परिसरातील पंधराशे नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता डोबीनगर आणि मोमीनपुरा भागातील 350 नागरिकांना विलगिकरण कक्षात पाठवले जात आहे.

Last Updated : May 6, 2020, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.