ETV Bharat / city

किमयागार देवेंद्र फडणविसांचे नागपुरात होणार जल्लोषात स्वागत, शहरात देवमाणसाचे बॅनर झळकले - नागपूर भाजप

गेल्या 15 दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणाला अशी कलाटणी मिळाली आहे की, सत्तेतील पक्षाला विरोधी बाकावर जाऊन बसावे लागले तर विरोधक सत्तेत आले आहेत. ही किमया घडवून आणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांचे उद्या नागपुरात आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाने ( BJP ) त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरात जागोजागी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत.

DEVENDRA_FADANVIS
DEVENDRA_FADANVIS
author img

By

Published : Jul 4, 2022, 9:57 PM IST

नागपूर - उपमुख्यमंत्री झाल्यानंतर उद्या देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) पहिल्यांदाच नागपूरला येणार आहेत. भारतीय जनता पक्षाकडून नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. हेडगेवार चौकातील स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण केल्यानंतर हेडगेवार चौक ते त्रिकोणी पार्क धरमपेठ अशी स्कूटर व कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वतः मुख्यमंत्रीपद सोडून एकनाथ शिंदे यांनी ते देणाऱ्या फडणविसांचे मोठेपण दर्शविणारी देवमाणूस असे लिहिलेली बॅनर्स शहरात विविध ठिकाणी झळकली आहेत.

नागपुरात होणार देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत

नागपूर भगवामय करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गातील विमानतळ ते त्रिकोणी पार्कच्या वाटेतील सर्व चौक रस्त्यांवर विशेषतः छत्रपती चौक, प्रताप नगर चौक, लक्ष्मी भवन चौक भगव्या रंगात रंगणार आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस यांचा सत्काराचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, आमदार शहर प्रवीण दटकेसह सर्व आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा - CM Eknath Shinde win Floor Test : एकनाथ शिंदे यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव, १६४ आमदारांचे मत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.