ETV Bharat / city

नागपूर पदवीधर निवडणूक: मतदार नोंदणीत आघाडी घेतल्यानेच माझा विजय- अभिजित वंजारी - nagpur latest news

गेल्या ५८ वर्षांपासून भाजपाने राखलेल्या गडाला खिंडार पडले आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपा उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी दमदार विजय मिळवला आहे.

अभिजित वंजारी
अभिजित वंजारी
author img

By

Published : Dec 4, 2020, 6:30 PM IST

नागपूर - नागपूर पदवीधर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी दमदार विजय मिळवला आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत त्यांनी विजयासाठीचा आवश्यक कोटा पूर्ण करत भाजपाच्या संदीप जोशींचा पराभव केला आहे. नागपूरच्या राजकारणात आपले भविष्य आजमावतांना अनेक वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, पदवीधरांचे आमदार झालेल्या अभिजित वंजारी यांनी भारतीय जनता पक्षाचा गड उद्धवस्त करत इतिहास रचला आहे.

अभिजित वंजारी

गेल्या ५८ वर्षांपासून हा गड भाजप आणि जनसंघाचा होता. मात्र आता या गडावर कॉंग्रसने मोहर उमटवली. सर्वात महत्वाचे म्हणजे अभिजित वंजारी यांनी मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत आघाडी घेत भाजपला चारी मुंड्या चित केले. गेल्या एक ते दीड वर्षांपासून ते या मतदारसंघात कार्यकर्त्यांची बांधणी करण्याच्या कामात व्यस्त होते. पक्षाकडून त्यांना उमेदवारी आधीच मिळाली असल्यामुळे अगदी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी निवडणुकी करिता व्यूह रचना आखली होती. काँग्रेस मधील अंतर्गत वादाची पार्श्वभूमीवर त्यांना माहिती असल्याने त्यांनी त्यावर फार काम न करता सुनील केदार यांच्या मदतीने प्रचाराचा शुभारंभ केला. सुरवातीला भारतीय जनता पक्षाने देखील त्यांची फार दखल घेतली नाही. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत पराभवाला समोर जावं लागलं. भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा तब्बल १८९१० मतांनी पराभव झाला आहे.

कोण आहेत अभिजित वंजारी?-

अभिजित गोविंदराव वंजारी हे नाव नागपूरात सर्वांच्या परिचयाचे आहे. 2004 मध्ये नागपूर दक्षिण मतदारसंघातून अभिजित यांचे वडील गोविंदराव वंजारी आमदार म्हणून जिंकून आले होते. मात्र, आमदार म्हणून विधानसभेत शपथ घेण्याच्या आधीच गोविंदराव वंजारी यांचे निधन झाले होते. राजकारणाच्या प्रथेप्रमाणे सर्वाना अपेक्षा होती की काँग्रेस पक्ष त्याकाळी युवा काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांना दक्षिण नागपूर मतदारसंघातून पोटनिवडणुकीत संधी देईल.

मात्र, काँग्रेसने तेव्हा अभिजित यांना संधी दिली नाही. परिणामी अभिजित त्या पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवार म्हणून लढले आणि 19 हजार 153 मतं घेऊन पराभूत झाले होते. अभिजितवर झालेल्या अन्यायाची काँग्रेस पक्षात चर्चा होऊन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नागपूर पूर्व मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली. मात्र, तेव्हा 50 हजार पेक्षा जास्त मतं घेऊनही त्यांचा पराभव झाला होता. अभिजित यांनी एकदा नगरसेवक पदाची निवडणूकही लढविली होती. मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला होता. सततच्या पराभवाने स्वतःला सावरत एलएलबी चे शिक्षण असलेल्या अभिजित यांनी काही दिवस वकिली करत विद्यापीठाच्या राजकारणातही नशीब अजमावले. तिथे त्यांच्या सेक्युलर पॅनलला अनेक वेळा लक्षणीय यश मिळाले.

स्वतः अभिजित आणि त्यांच्या पत्नी डॉ स्मिता वंजारी यांनी सिनेटमध्ये विद्यार्थी, तरुण, बेरोजगार यांच्यासाठी कामे केली. तिथेच अभिजित वंजारी यांना पदवीधर मतदारसंघासाठीचे निवडणुकीचे कौशल्य आत्मसात करता आले. गेले दोन वर्षे त्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी तयारी केली. न्यायालयाच्या निर्देशाने पदवीधर मतदारसंघाची जुनी मतदार यादी रद्दबातल ठरली. त्यानंतर भाजपला चित करायचे असल्यास मतदार नोंदणीत लक्ष केंद्रित करावे लागेल. हे अभिजित यांना कळाले. त्यांनी हजारोंच्या संख्येने पदवीधर तरुणांचे नाव नोंदवून आपला आधार भक्कम केला. जास्त गाजावाजा न करता लो प्रोफाइल राहून प्रचार केला, स्वतःचा ओबीसी कार्ड खुबीने वापरला आणि भाजपचा 58 वर्षांचा गड सहज काबिज केला.

जातीचे समीकरण पराभवाचे कारण-

गेल्या ५८ वर्षांपासून नागपूर पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. या ५८ वर्षांच्या काळात ब्राम्हण उमेदवारचं भाजपकडून देण्यात आले. यावेळी तरी बदल व्हावा अशी मागणी जोर धरत असताना सुद्धा भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडून या मागणी कडे दुर्लक्ष केले गेले. याचा थेट फटका भाजपला बसलेला आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे तेली समाज प्रचंड नाराज झाला होता. या निवडणुकीत तेली समाजातील उमेदवाराला भाजप उमेदवारी देईल. अशी आशा अनेकांना होती. मात्र वर्षोनुवर्षे सुरू असलेली परंपरा कायम ठेवून भाजपवर ओबीसी समाजची नाराजी आणखीच ओढवली ज्याचा फटका त्यांना या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून बसला आहे.

अनिल सोले यांना डावलल्याने गडकरी यांची नाराजी-

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदे आमदार अनिल सोले हे देखील उमेदवादी मिळेल. या आशेवर होते, ऐनवेळी त्यांना डावलून संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली. संदीप जोशी हे फडणवीस गटाचे मानले जातात. तर अनिल सोले हे गडकरी गटाचे असल्याचा समज आहे. उमेदवार निवडीत गडकरी गटाला डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली होती. शेवटचे दोन दिवस गडकरींनी संदीप जोशी यांच्यासाठी प्रचार केला. अनिल सोले हे देखील फारसे सक्रिय दिसत नसल्याने त्यांची नाराजी देखील संदीप जोशींसह भाजपला महागात पडली आहे.

तुकाराम मुंढे विरुद्धच्या वादाचा फटका-

नागपूर महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे कार्यरत असताना महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्यासोबत कधीही जमवून घेण्याचा प्रयत्न केला नाही. संदीप जोशी विरुद्ध तुकाराम मुंढे हा वाद समाज माध्यमांवर प्रचंड रंगला होता. ज्यामुळे संदीप जोशी यांची प्रतिमा मुंढे विरोधी अशीच रंगवण्यात आली होती. याउलट तुकाराम मुंढे यांच्या चाहत्यांची संख्या लक्षणीय वाढली होती. निवडणूकीच्या प्रचारात सुद्धा हा मुद्दा चर्चेत राहिला होता.

हेही वाचा- तीन पक्षांनी मिळून हरवले; हिंमत असेल तर एकटे लढा - चंद्रकांत पाटील

हेही वाचा- पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी; भाजपला शून्य जागा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.