नागपूर - हुडकेश्वर पोलीस स्टेशन लग्नसमारंभात जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी रात्री पिंपळा फाट्याजवळ डांगे लॉनमध्ये घडली. यात आचाऱ्याचा कॅटर्सचे मुले पुरवणाऱ्या ठेकेदाराशी पैश्याच्या कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने आचाऱ्याची हत्या केली. ही हत्या अवघ्या सात ते आठ हजार रुपयांसाठी झाली, असल्याचे तपासात पुढे आले आहे. अखिलेश मिश्रा असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी दोघांना हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.
यात अनिल खोब्रागडे हा कॅटर्सचा कंत्राटदार असून त्याने अखिलेश मिश्रा याला दोन दिवस कॅटर्ससाठी मुलं दिले होते. यात साधारण 7 मुलांचे पैसे द्यायचे होते. यात कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात असल्याने लग्न समारंभ असलेल्या कुटुंबाकडून पैसे मिळतील मग देतो, असे अखिलेश मिश्रा यांनी सांगितले. एवढ्या बोलण्यावरून वाद झाला.
रक्तस्त्राव झाल्याने अखिलेशचा मृत्यू-
रागाच्या भरात अनिल खोब्रागडे आणि त्याचा मित्र तेजस शेंडे या दोघांनी अखिलेश मिश्रा यांना मारहाण केली. यात चाकूने वार अखिलेश मिश्रावर यांच्यावर वार केले. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेला पुतण्या सुद्धा जखमी झाला आहे. रक्तस्त्राव झाल्याने अखिलेशचा मृत्यू झाला.
यावेळी माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. यात दोघांना अटक करत न्यायालयापुढे हजर केले.
हेही वाचा- तोडगा निघेल का? केंद्र सरकारशी शेतकरी संघटनांची २९ तारखेला पुन्हा बैठक