ETV Bharat / city

नागपूर : दिलासादायक! दहा दिवसांत ५७ हजार रुग्णांची कोरोनावर मात

सध्या कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या जरी अधिक दिसून येत असली तरी कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आणि कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल, असा विश्वास प्रशासकीय यंत्रणा करत आहे.

author img

By

Published : Apr 27, 2021, 7:00 PM IST

Updated : Apr 27, 2021, 7:42 PM IST

Nagpur COVID hospital
नागपूर कोव्हिड रुग्णालय

नागपूर - कोरोनाच्या संकटात दिलासादायक बातमी आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये संपूर्ण नागपूर जिल्ह्यात तब्बल ५७ हजार नागरिकांनी कोरोनावर मात केलेली आहे.

रोज हजारांमध्ये वाढणारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या, शेकडो रुग्णांचे होणारे मृत्यू आणि सर्वत्र अव्यस्थेचा बाजार यामुळे प्रत्येकाच्या काळजाचे ठोके वाढलेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडे पुढे आले आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये संपूर्ण नागपूर जिल्ह्यात तब्बल ५७ हजार नागरिकांनी कोरोनावर मात केलेली आहे. सध्या कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या जरी अधिक दिसून येत असली तरी कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आणि कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल, असा विश्वास प्रशासकीय यंत्रणा करत आहे.

दहा दिवसांत ५७ हजार रुग्णांची कोरोनावर मात

नागपूरात फेब्रुवारी, मार्च आणि सध्या सुरू असलेल्या एप्रिल महिन्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. दर महिन्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. गेल्या दीड वर्षाती कोरोनाच्या रुग्णसंख्येचे सर्व रेकॉर्ड एप्रिल महिन्याच्या शेवटी मोडीत निघालेले आहेत. पण गेल्या दहा दिवसांत नागपूरात कोरोना बधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या समाधानकारक ठरत आहे. नागपूरात १७ ते २६ एप्रिलमध्ये ७० हजार ९९७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, याच काळात ५७ हजार १८ नागरिकांनी कोरोनावर मातदेखील केली आहे. याचाच अर्थ असा होतो की गेल्या दहा दिवसांमध्ये नागपूरात ८० टक्के लोकांनी कोरोनाला मात दिलेली आहे

हेही वाचा-'निवडणूक आयोगच्या अध्यक्षांना केंद्र सरकारने राज्यपालपद बहाल केल्याची चर्चा'

दहा दिवसांत ९१६ लोकांचा मृत्यू
एकीकडे नागपूर जिल्हात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या दहा दिवसाचा आलेख बधितला तर सध्या रुग्ण संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ८० टक्क्यांपर्यंत वाढलेली दिसत आहे. तरीही मृत्यूचे आकडे मात्र घाबरवणारे आहेत. गेल्या दहा दिवसात ९१६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक १९ एप्रिल रोजी ११३ रुग्ण दगावले होते.

हेही वाचा-माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्या लेखाला देवेंद्र फडणवीसांनी दिले उत्तर

Last Updated : Apr 27, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.