ETV Bharat / city

Vidarbha Rain Update : विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मॉन्सून दाखल; सर्वत्र पावसाचा अंदाज

संपूर्ण विदर्भात मॉन्सून दाखल झाला आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यात मोसमी पावसाला ( Seasonal rains in 11 districts of Vidarbha ) सुरुवात झाली असल्याची माहिती नागपूर हवामान विभागाने ( Nagpur Meteorological Department ) दिली आहे. कालपासून विदर्भात ढगाळ ( Vidarbha Monsoon Update ) वातावरण निर्माण झाल्याने हवामानात बदल झाला होता.

author img

By

Published : Jun 16, 2022, 3:37 PM IST

Updated : Jun 16, 2022, 3:48 PM IST

Vidarbha Rain Update
Vidarbha Rain Update

नागपूर - विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज ( गुरुवारी ) संपूर्ण विदर्भात मॉन्सून दाखल झाला आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यात मोसमी पावसाला ( Seasonal rains in 11 districts of Vidarbha ) सुरुवात झाली असल्याची माहिती नागपूर हवामान विभागाने ( Nagpur Meteorological Department ) दिली आहे. कालपासून विदर्भात ढगाळ ( Vidarbha Monsoon Update ) वातावरण निर्माण झाल्याने हवामानात बदल झाला होता. आज सकाळपासूनच विदर्भातील अनेक जिल्ह्यात तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या पाऊसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विदर्भात मॉन्सूनचे ऑफिशीली आगमन झाल्याचे हवामान विभागाने घोषित केले आहे. पुढील काही दिवस विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

प्रतिक्रिया देताना हवामान विभाग अधिकारी

'येत्या काही दिवसांत पाऊस जोर धरेल' : विदर्भात साधारणतः 15 जून पर्यंत मान्सून आगमन होते. मात्र, या वेळी केवळ एक दिवस उशिरा मान्सून विदर्भात दाखल झाला आहे. सध्या मान्सूनची स्थिती फार मजबूत नसली तरी येत्या काही दिवसात पाऊस जोर धरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज : भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यामध्ये देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Monsoon Update : महाराष्ट्रात मॉन्सूनची हजेरी; अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी

Last Updated : Jun 16, 2022, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.