मुंबई - मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनसमोर भोंगा लावून हनुमान चालीसा लावला. सरकारला जाग यावी आणि शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण यावी याकरिता राम नवमीनिमित्त थेट शिवसेना भवनसमोर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी भोंगा लावला होता. शिवाजी पार्क पोलिसांनी भोंगा बंद करून यशवंत किल्लेदार आणि चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
शिवसेनेने हिंदुत्व बासनात गुंडाळलं - मनसे विरुद्ध शिवसेना हा वाद दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चालला आहे. एकीकडे मनसे शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टार्गेट करत आहेत. मात्र, आता याचा पुढचा टप्पा मनसेने गाठला असून मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा व हनुमान पाठ भोंग्यावर वाजवून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काही वेळातच पोलिसांनी हस्तक्षेप करत भोंगे ताब्यात घेतले. यासंदर्भात बोलताना यशवंत किल्लेदार म्हणाले की, "काही लोकांनी आपला हिंदुत्वाचा मार्ग सोडून ते बासनात गुंडाळून ठेवलं आहे. आणि त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही आज हा हनुमान चालीसा पाठ करणारा रथ फिरवत आहोत. हा रथ मुंबईत काही ठिकाणी फिरेल. ज्यांना कोणाला हा रथ हवा असेल त्यांना तो मोफत हनुमान चालीसा वाजवण्यासाठी मिळेल."
-
#WATCH | Maharashtra: Mumbai Police later stopped the Hanuman Chalisa on a loudspeaker that was being played by MNS outside Shiv Sena HQ in Mumbai. MNS leader Yashwant Killedar detained and taken to Shivaji Park police station. pic.twitter.com/Susq4AdWqY
— ANI (@ANI) April 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Maharashtra: Mumbai Police later stopped the Hanuman Chalisa on a loudspeaker that was being played by MNS outside Shiv Sena HQ in Mumbai. MNS leader Yashwant Killedar detained and taken to Shivaji Park police station. pic.twitter.com/Susq4AdWqY
— ANI (@ANI) April 10, 2022#WATCH | Maharashtra: Mumbai Police later stopped the Hanuman Chalisa on a loudspeaker that was being played by MNS outside Shiv Sena HQ in Mumbai. MNS leader Yashwant Killedar detained and taken to Shivaji Park police station. pic.twitter.com/Susq4AdWqY
— ANI (@ANI) April 10, 2022
राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भोंगे वाजायला सुरुवात - काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली होती. मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवू, असे राज ठाकरे म्हणाले होते. ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा पठण सुरू केले. दरम्यान, यशवंत किल्लेदार यांच्यासह ज्या वाहनावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण केले जात होते ते वाहनही पोलिसांनी जप्त केले. त्याच बरोबर पोलिसांनी मनसे नेते यशवंत किल्लेकर यांना ताब्यात घेऊन शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गेले.