चंद्रपूर - बल्लारपूर शहरातील एका कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये 16 वर्षीय मुलीची छेड काढल्याने भाजप कार्यकर्त्यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी Expulsion of BJP leader from the party करण्यात आली. 30 ऑगस्टला सकाळच्या सुमारास पीडित मुलगी कामानिमित्त इन्स्टिट्यूटमध्ये गेली होती. इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना MSCIT चे प्रशिक्षण दिले जाते.
सकाळी विद्यार्थी आलेले नव्हते त्या वेळेचा गैरफायदा घेत इन्स्टिट्यूट संचालक संजय वाजपेयी याने मुलीला, मला तू आवडते असे म्हणत तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने तात्काळ तिथून बाहेर पडत शेजारी असलेल्या ओळखीच्या महिलेला सदर बाब सांगितली. त्या महिलेने तातडीने सदर बाब मुलीच्या घरी सांगितली. आईने मुलीला विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
आरोपी वाजपेयी हा भाजप पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्याने राजकीय पक्षातील मित्रांना प्रकरण मिटविण्यासाठी बोलाविले.
विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला, पण मुलीने खंबीर भूमिका घेत मागे हटणार नसल्याची भूमिका घेतली. 1 सप्टेंबर ला कम्प्युटर इन्स्टिट्यूट वाजपेयी याने सुरू केल्यावर नागरिकांनी वाजपेयीला चांगलाच चोप देत बल्लारपूर पोलीस ठाण्यात नेले. पीडित मुलीने पोलिसांसमोर संपूर्ण प्रकाराची बाब नोंदविली. बल्लारपूर पोलिसांनी तात्काळ संजय वाजपेयी वर कलम 354, 354 A (I) (i) व पोक्सो 12 व 8 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. हे प्रकरण समोर येताच भाजपने आरोपी वाजपेयी याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.