नागपूर - शहरात १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. शहरातील जरीपटका भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी ही तिच्या मैत्रिणीची वाट पाहत थांबली असता आरोपींनी तिचे अपहरण करून बलात्कार केला. ही घटना १२ नोव्हेंबरला घडली.
एकटी असल्याचा घेतला फायदा
मैत्रीणीची वाट पाहत रस्ताच्या कडेला उभ्या असलेल्या मुलीचे दोन तरूणांनी अपहरण केले. त्यानंतर जवळच्याच जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. शिवाय उशीरा आरोपींनी मुलीला घरी सोडले. पीडित मुलीने घडलेली घटना आपल्या आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर शहरातील जरीपटका पोलिसांनी घटनेचा तपास करून काही तासातच दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शमशाद अन्सारी आणि बबलू कतवटे अशी दोन्ही आरोपीचे नाव आहे.
असा लागला आरोपींचा सुगावा -
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात दोन तरूण पीडित मुलीसोबत बोलत असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही आरोपींच्या वेशभूषा व शरिरयष्टीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. त्यानंतर आरोपीची ओळख पटताच त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हेही वाचा -अल्पवयीन मूक बधिर मुलीवर अत्याचार; सोलापुरातील संतापजनक प्रकार
हेही वाचा - कानपुरमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीची अंधश्रद्धेतून हत्या, अत्याचार केल्याचेही निष्पन्न