ETV Bharat / city

Vijay Wadettiwar on Sadavarte : सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच करवाई होणे अपेक्षित होते, जरा लेट झाले - विजय वडेट्टीवार - सदावर्ते कारवाई विजय वडेट्टीवार प्रतिक्रिया

सदावर्ते यांच्यावर कारवाई यापूर्वीच होणे अपेक्षित होते, पण आम्ही लेट झालो. शरद पवार यांच्या घरावर झालेली घटना ही निंदनीय असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले ( Minister Vijay Wadettiwar comment on Gunratna Sadavarte ).

Minister Vijay Wadettiwar comment on gunratna sadavarte
सदावर्ते कारवाई विजय वडेट्टीवार प्रतिक्रिया
author img

By

Published : Apr 9, 2022, 11:03 AM IST

Updated : Apr 9, 2022, 11:49 AM IST

नागपूर - सदावर्ते यांच्यावर कारवाई यापूर्वीच होणे अपेक्षित होते, पण आम्ही लेट झालो. शरद पवार यांच्या घरावर झालेली घटना ही निंदनीय असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले ( Minister Vijay Wadettiwar comment on Gunratna Sadavarte ). ते नागपुरात त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.

माहिती देताना विजय वडेट्टीवार

हेही वाचा - Raut vs Somaiya : नाशिकमध्ये शिवसेनेने काढली सोमैयांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

कोर्टाच्या नावने सदावर्ते यांनी भरमसाठ फी वसूल केली आहे. भडकाऊ भाषणे करून कर्मचाऱ्यांना आंदोलनासाठी उद्युक्त करण्याचा हा धंदा होता. एसटीच्या संपामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झाली होती. सदावर्ते यांना याचे काही देणेघेणे नव्हते. लोकांचे हाल होत आहे. त्यामुळे, अधिक करवाई करणे गरजेचे आहे. या हल्ल्यामागे कोण आहे याचा शोध घेतला जाईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या हल्ल्यामागे नागपूर कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. त्यावर, असे बोलणे योग्य होणार नाही, त्यावर मी भाष्य करणार नाही. या कटकरस्थानामागे कोण आहे याची चौकशी होईल. तपासात समोर येईल. या हल्ल्यामागे कोण आहे? हे कसे काय घडले? याची चौकशी गृहविभागाने केली पाहिजे. यामागे जो कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

केंद्र सरकारकडून कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, आपण काळजी घेण्याची गरज आहे. साऊथ आफ्रिकेतून आलेला नवीन रुग्ण बरा झाला आहे. तरी मास्क घालून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

हेही वाचा - Satana Murder case : घरी आल्याने खून; सटाण्यातील खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

Last Updated : Apr 9, 2022, 11:49 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.