ETV Bharat / city

Vijay Vadettiwar On New Year : नवं वर्ष आरोग्यदायी जावे यासाठी सरकारने निर्बंध लावलेत ; मंत्री वडेट्टीवारांचे वक्तव्य - करडई तेलाचे ब्रॅण्डिंग

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar ) यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारने लावलेल्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर कालीचरण यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील खरमरीत शब्दात टीका केली. तसेच करडईच पीकाबद्दल माहिती दिली.

Minister Vadettivar
मंत्री विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Dec 31, 2021, 12:29 PM IST

Updated : Dec 31, 2021, 1:14 PM IST

नागपूर : मागील काही दिवसात राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण ( Corona and omicron patient maharashtra ) हे दुपटीने वाढत आहे. लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नाईट कर्फ्यूच्या ( Maharashtra Night curfew ) माध्यमातून निर्बंध घातलेले आहेत. नवं वर्षाची सुरुवात ही आरोग्यादायी व्हावी या हेतूने निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. ते नागपूरच्या विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. नववर्षाचे स्वागत करताना होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी किंवा निर्बंध घालने हा सरकारचा उद्देश नाही. तर पार्ट्या किंवा डान्स करताना गर्दी होऊन सामाजिक अंतर पाळले जाऊ शकत नाही. त्यामुळे कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका संभवतो. म्हणून सरकारने निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.

महात्मा गांधीजींवर बोलावे इतकी कालीचरणची लायकी नाही -
कालीचरण हा अकोल्यातील भोंदू आणि नालायक माणूस आहे. जो धर्माच्या नावावर लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहे. त्याच्या अटकेची मागणी केली होती. केवळ प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करत शिक्षा झाली पाहिजे. महात्मा गांधीवर वक्तव्य करावे इतकी कालीचरणची लायकी नसल्याचेही काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

विदर्भात गारपिट नुकसानीचे सर्वेक्षण करणार -
नुकतेच विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीटमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आणि सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जाईल. जो काही नुकसानीचा अहवाल समोर येईल त्यात एसडीआरएफच्या निकषानुसार मदतही केली जाईल. अशी माहिती मंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

महाज्योतिच्या नावाने करडईचे ब्रॅण्डिंग होणार -
महाज्योतिच्या माध्यमातून 15 हजार हेक्टरवर करडईचे पीक ( Safflower crop ) घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, करडई पीक स्वस्त आणि शेती करायला सोपे आहे. या पिकाला जंगली जनावर किंवा गुरं-ढोरं खात नाहीत. त्यात बाजारपेठेत करडईचे तेलाची मागणी अधिक आहे. शिवाय हे तेल खाणे आरोग्यास फायदेशीर आहे. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून दिले आहे. पीक निघाल्यावर कच्ची घाणीतून तेल काढून क्लस्टर तयार करून बाजारात जाईल. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ज्या भागात जंगली जनावर किंवा वाघाच्या भीतीमुळे शेती करण्यास अडचण आहे. तिथे एकदा पेरून पीक काढणीला जावे लागत असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. हे तेल महाज्योतिच्या नावानेच ब्रॅण्डिंग करून विकले जाणार आहे.

Last Updated : Dec 31, 2021, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.