ETV Bharat / city

कापूस, तूर पिकाला पर्याय म्हणून मका पिकाकडे वळा; मंत्री केदारांचे आवाहन - मकेपासून इथेनॉल निर्मिती

तूर, कपाशीचे पीक पारंपरिक असल्याने जमिनीचा पोत घसरत जात आहे. मात्र, सध्या मका पिकाची बाजारात मागणी वाढू लागली आहे. यात मका पीक हे पोल्ट्री व्यवसायात पक्षांचे खाद्य म्हणून सुद्धा उपयोग होत आहे. तसेच दुभत्या जनावरांसाठी मकेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. येत्या काळात मका पिकापासून इथेनॉल निर्मिती सुरू झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पण यासाठी मकेचे उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचे मत मंत्री केदार यांनी व्यक्त केले.

तूर पिकाला पर्याय म्हणून मका पिकाकडे वळा; मंत्री केदारांचे आवाहन

author img

By

Published : Jun 21, 2021, 8:03 AM IST

Updated : Jun 21, 2021, 9:12 AM IST

नागपूर - सध्याची परिस्थिती पाहता तूर आणि कापूस आदी पीक किती दिवस साथ देतील याची शाश्वती नाही. यामुळे शेतकऱ्यांनी मका पीक घेण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. सध्या दुग्ध उत्पादक क्षेत्रातून मकेची मागणी वाढली आहे. तसेच मकेपासून इथेनॉल निर्मिती करता येईल का? यावर संशोधनाचे काम सुरू आहे. सध्या केंद्रासोबत करार करून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे मका पिकाबाबत ही प्रयत्न करण्यात येत आहेत. जेणे करून ज्याप्रमाणे इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्याला पर्याय म्हणून इथेनॉलाच वापर वाढवून इंधन दरावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात मका पिकाच्या उत्पादनाकडे वळायला हवे, असे आवाहन मंत्री केदार यांनी केले आहे.

तूर पिकाला पर्याय म्हणून मका पिकाकडे वळा; मंत्री केदारांचे आवाहन

सावनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने मका आणि कापूस पिकावरील कीड नियंत्रण याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना मंत्री केंदार यांनी शेतकऱ्यांनी मका पिकाचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले. यावेळी मंचावर जिल्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बरवे, मनोहर कुंभारे, जिल्हा परिषद कृषी सभापती तापेश्वर वैद्य, सावनेर बाजार समितीचे सभापती बंडू चौधरी, कळमेश्वर बाजार समितीचे सभापती बाबा पाटील यासह शेतकरी उपस्थित होते.

मकेला मागणी जास्त, उत्पादन वाढवण्याची गरज-

तूर, कपाशीचे पीक पारंपरिक असल्याने जमिनीचा पोत घसरत जात आहे. मात्र, सध्या मका पिकाची बाजारात मागणी वाढू लागली आहे. यात मका पीक हे पोल्ट्री व्यवसायात पक्षांचे खाद्य म्हणून सुद्धा उपयोग होत आहे. तसेच दुभत्या जनावरांसाठी मकेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. येत्या काळात मका पिकापासून इथेनॉल निर्मिती सुरू झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पण यासाठी मकेचे उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचे मत मंत्री केदार यांनी व्यक्त केले.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. जीवन कातोरे यांनी शेतकऱ्यांना मका लागवड व तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मका लागवडीचे तंत्र, हंगाम, खते, बियाणे इत्यादी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित डॉ. राहुल बाविस्कर यांनी मका पीक घेताना कीड व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात माहिती दिली. यावेळी पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. कारण नैसर्गिक संकटाने पिकाचे नुकसान झाल्यास पीक विम्याचा फायदा होईल असे सांगितले.

Last Updated : Jun 21, 2021, 9:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.