ETV Bharat / city

Vidhan Parishad Election 2021 : महानगरपालिकेच्या मिनी लिटमस टेस्टमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेसमध्ये रंगदार चुरशीची शक्यता कमीच

author img

By

Published : Dec 8, 2021, 8:52 PM IST

Updated : Dec 8, 2021, 9:01 PM IST

भाजपाने खेळलेल्या राजकीय डावपेचाच्या चक्रव्यूहात काँग्रेस पुरती अजूनही अडकून पडलेली दिसत आहे. सध्या भाजपा आणि काँग्रेस ( BJP and Congress ) पक्षात आरोप प्रत्यारोपाचे युद्ध रंगलेले आहे. भाजपा घोडेबाजार करत असल्याची तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला ( Complaint to Election Commission ) केली आहे. तर भाजपाने सगळे आरोप फेटाळत पराभवाच्या मानसिकतेत काँग्रेस उमेदवार असल्याचा पलटवार केला आहे.

भाजपा विरुद्ध काँग्रेस
भाजपा विरुद्ध काँग्रेस

नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ( Local Body Elections ) नागपूर मतदार संघाच्या निवडणूकीचा काउंटडाऊन सुरू झाला आहे. प्रथमदर्शनी ही निवडणूक भाजपासाठी अत्यंत सोपी आणि सोयीची मानली जात असली तरी काँग्रेसकडून मात्र दमदार राजकीय खेळी खेळण्यात आली. ज्यामध्ये भाजपाच्याच नगरसेवकाला गळाला लावून भाजपासमोर आवाहन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरुवातीला भाजपा गारद झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर भाजपाने खेळलेल्या राजकीय डावपेचाच्या चक्रव्यूहात काँग्रेस पुरती अजूनही अडकून पडलेली दिसत आहे. सध्या भाजपा आणि काँग्रेस ( BJP and Congress ) पक्षात आरोप प्रत्यारोपाचे युद्ध रंगलेले आहे. भाजपा घोडेबाजार करत असल्याची तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला ( Complaint to Election Commission ) केली आहे. तर भाजपाने सगळे आरोप फेटाळत पराभवाच्या मानसिकतेत काँग्रेस उमेदवार असल्याचा पलटवार केला आहे.

दोन्ही पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आणि भाजपा नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांना काँग्रेसने गळाला लावून थेट भाजपाला विधान परिषद निवडणूकित आवाहन दिले आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता होती. मात्र जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तस तस काँग्रेस प्रचारात कुठेही दिसत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीचे 2 मंत्री 1 खासदार 4 आमदार जिल्ह्यात आहे. मात्र हे सगळे स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारापासून दूर झाले आहेत. त्यातही राष्ट्रवादी पक्ष नाराज असून बसपा आणि एमआयएम पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

  • काँग्रेस नेते प्रचारारून गायब

घोडेबाजाराचा आरोप दोन्ही पक्ष करत असले तरी भाजपा व्ह्यूव रचनेच्या माध्यमातून ही निवडणूक लढत असून दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्षाचे उमेदवार छोटू भोयर यांना पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसतोय. कुठलाही मोठा नेता छोटू भोयर यांच्यासाठी अद्यापही थेट मैदानात उतरला नाही. त्यामुळे भाजपामधून काँग्रेसवासी झालेले छोटू भोयर यांच्यावर एकट्याने निवडणुकीला समोर जावे लागत आहे. याही स्थितीत चमत्कार होईल असा विश्वास भोयर यांना आहे. विधानपरिषदेची ही निवडणूक आगामी महानगर पालिकेची मिनी लिटमस टेस्ट असून 14 तारखेला उघडणाऱ्या मतपेटी कोणाला कौल देईल आणि कोण विजयी होईल, याची उत्सुकता स्पष्ट होईल. या निवडणुकीत एकूण ५५६ मतदार आहेत. त्यापैकी 314 हे भाजपाकडे तर 144 मतदारांचा आकडा हा काँग्रेसकडे आहे. याशिवाय 98 मतदार इतर आहेत.

  • 'निकालात चमत्कार घडेल'

भाजपाकडून काँग्रेसचा उमेदवार छोटू भोयर हे गायब आहे. पळ काढला आहे, असा खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप उमेदवार छोटू भोयर यांनी आरोप केला. भाजपा कन्फ्युज करत असली तरी मतदानाच्या दिवशी चमत्कार घडेल, असा विश्वास छोटू भोयर व्यक्त करत आहे.

  • 'काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेत'

पदवीधर मतदार संघात भाजपाचा झालेला पराभव भाजपाला चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे भाजपाकडे अधिक मत असताना देखील भाजपासावध भूमिकेत आहे. भाजपाने 300 पेक्षा अधिक नगरसेवक आणि इतर मतदार आधी पर्यटनासाठी पाठविले होते. ही निवडणूक भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी राजकीय भवितव्य ठरवणारी असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेस पक्ष पराभुत मानसिकतेत असून भाजपावर आरोप करत असल्याचे भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Vidhan Parishad Election 2021 : सहलीला गेलेले भाजपाचे 'ते' नगरसेवक नागपुरात परतले

Last Updated : Dec 8, 2021, 9:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.