नागपूर - जगातला एकमेव आणि सुमारे शंभर वर्षांपासून सुरू असलेला ऐतिहासिक मारबत महोत्सवाला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. शहराच्या प्रमुख मार्गाने मारबत आणि बडग्यांची मिरवणूक निघाली असून इतवारी परिसरातील नेहरू पुतळा चौकात दोन्ही मारबतींचे मिलन झाले.
हेही वाचा - 'घेऊन जा गे मारबsssssत', नागपुरात मारबत उत्सवाची तयारी पूर्ण, 'हे' आहे काळ्या, पिवळ्या मारबतींचे महत्त्व
मारबत महोत्सवात नागपूरकर उत्साहाने सहभागी झाले आहेत. देशात फक्त नागपुरात हा उत्सव साजरा केला जातो. वाईट परंपरा, रोगराई आणि संकटे समाजातून घालवाव्या आणि चांगल्याचे स्वागत करावे, यासाठी ही मारबत निघत असते. यात अनेक बडगे सुद्धा असतात त्यांचे विसर्जन केले जाते. बडगे हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जाताता. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर जाळण्याचा आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे.
हेही वाचा - यंदाचा गणेशोत्सव : नागपूरमध्ये पीओपीच्या मूर्त्यांची सर्रास विक्री; मनपाच देतेय विक्रेत्यांना अभय
जाणून घ्या मारबत महोत्सव...
मारबत महोत्सवात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते. काळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशी जोडला जातो. त्या काळात पुतना मावशीने भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची मारबत काढली आणि गावाबाहेर नेऊन जाळले. तेव्हापासून गावावर समस्या आणि संकटे येत नाहीत, अशी आख्यायिका सांगितली जाते. या दिवशी पिवळी मारबतही काढण्यात येते. या मारबतींना शहराच्या बाहेर जाळल्यामुळे शहरातील अंधश्रद्धा आणि संकटे संपतात, अशी लोकमान्यता आहे. पिवळी मारबतेही तेली समाजातर्फे 'ईडा पीडा घेऊन जाऽऽ गे मारबत' असे म्हणत पिवळी मारबत काढली जाते.