ETV Bharat / city

'उद्या'ला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार आज नाकारला - साहित्यिक नंदा खरे

उद्या ही कादंबरी मोठ्या शहरातील आधुनिक जगात जगणाऱ्या पात्रांपासून अगदी गडचिरोलीतील आदिवासी भागात जगणाऱ्या गरीब पात्रांच्या जीवनाचा वेध घेणारी कादंबरी आहे. लेखनातील सल, वर्तमान समाजात घडणाऱ्या गोष्टींचा वेध घेण्यात आला आहे. कांदबरीत वेगवेगळी पात्रे उत्तम प्रकारे साकारण्यात आली आहेत.

udya novel
'उद्या'ला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार आज नाकारला
author img

By

Published : Mar 13, 2021, 6:44 AM IST

नागपूर - लेखन क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. यंदाचा हा पुरस्कार नामवंत सहित्यिक नंदा खरे यांच्या 'उद्या' या कादंबरीला जाहीर झाला. मात्र, साहित्यिक नंदा खरे यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला आहे.

समाजाकडून मला भरपूर मिळाले आहे. यामुळे आणखी घेत राहणे मला इष्ट वाटत नाही, अशा भावना व्यक्त करीत ख्यातनाम साहित्यिक नंदा खरे यांनी "उद्या' या साहित्यकृतीला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. यावेळी त्यांनी पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून आभारही मानले. तसेचही माझी वैयक्तित भूमिका मी मांडत असल्याचेही खरे यांनी आपल्या अल्प निवेदनात म्हटले आहे.

समाजात घडणाऱ्या गोष्टींचा वेध घेणारी कांदबरी-

उद्या ही कादंबरी मोठ्या शहरातील आधुनिक जगात जगणाऱ्या पात्रांपासून अगदी गडचिरोलीतील आदिवासी भागात जगणाऱ्या गरीब पात्रांच्या जीवनाचा वेध घेणारी कादंबरी आहे. लेखनातील सल, वर्तमान समाजात घडणाऱ्या गोष्टींचा वेध घेण्यात आला आहे. कांदबरीत वेगवेगळी पात्रे उत्तम प्रकारे साकारण्यात आली आहेत.

अब्जाधीशांची संपत्ती कैक पटीने वाढली-

पुरस्कार नाकारला असला तरी वयोमानाचा विचार करत फार लेखन कार्य होणार नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. तसेच यापुढेही लेखन करत राहणार. खासकरून कोरोना काळात जेव्हा जगातील बहुतांशी जनता अडचणीतून जीवन जगत होती. त्यावेळी अब्जाधीशांची संपत्ती कैक पटीने वाढली आहे. या बाबी लेखनातून मांडणार असल्याचे खरे यांनी सांगितले.

नंदा खरे विदर्भातील नागपूरचे रहवासी आहे. ते स्थापत्य अभियंते असून विदर्भातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राहिले आहेत. बांधकाम क्षेत्रात कार्यरत राहतानाच त्यांनी लेखन कार्य सुरू केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी बांधकाम क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर पूर्णवेळ लेखन कार्याला दिले. विज्ञान, भूशास्त्र सारख्या विषयांवर अनेक पुस्तके लिहिल्यानंतर 2012 पासून नंदा खरे यांनी उद्या ही कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये "उद्या" ही कादंबरी प्रकाशित झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.