नागपूर - मी एक्ससाईस विभागाचा माजी अधिकारी आहे, तुम्हाला दारू विक्रीचा परवाना मिळवून देतो अशी बतावणी करून मुंबई, पुणे, सातारा आणि नागपुराच्या अनेकांना लाखो रुपयांनी गंडा घालणाऱ्या एका तोतयाला अधिकाऱ्याला नागपूरच्या सक्करदार पोलिसांनी अटक केली आहे. शुभम नदीश्वर शहा असे आरोपीचे नाव असून तो सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे त्याने केले आहेत. आरोपी शुभमची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाली होती, त्यानंतर तो देखील इतरांची फसवणूक करत होता अशी माहिती समोर आली आहे.
मी उत्पादन शुल्क विभागाचा माजी अधिकारी - शुभमने सांगितले की मी राज्य उत्पादन शुल्क विभागात म्हणजेच एक्ससाईस विभागात नोकरीला होतो. मात्र,मी पदाचा राजीनामा दिला आहे. आता लोकांना दारू विक्रीचा परवाना मिळवून देतो. सचिनचा विश्वास बसावा यासाठी आरोपीने खोटी वर्दी देखील दाखवली. आरोपी शुभमने फिर्यादी सचिनला दारू विक्रीचा परवाना मिळवून देतो असे आश्वासन देऊन सुमारे अडीच लाख रुपये वसूल केले.
70 लाखांचा चेक बाऊन्स - आरोपीने फिर्यादीला दुकान विकत घेण्यासाठी 70 लाख रुपयांचा चेक दिला. मात्र, तो चेक कॅश झाला नाही तेव्हा फिर्यादी सचिनला आरोपीवर संशय आला. त्याने यासंदर्भात सक्करदार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असताना फसवणूकीच्या प्रकार उजेडात आला आहे. सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटा ताजबाग परिसरात फिर्यादी सचिन बेलेचे झेरॉक्स दुकान आहे. आरोपी शुभम सचिनच्या दुकानात नेहमी झेरॉक्स काढण्यासाठी यायचा. त्यामुळे त्याची थोडीफार ओळख झाली होती. कागदपत्रे कशाची असल्याची विचारणा केली.
राज्यात अनेकांना फसवले -पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच शुभम ने गुन्ह्याची कबुली दिली. शुभम हा मूळचा साताऱ्याचा असून तिथे देखील त्याने अनेकांची फसवणूक केल्याचं तपासात उघडं झालं आहे. एवढंचं नाही मुंबई आणि पुण्यात देखील त्याच्या विरोधात अश्याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा - Arjun Khotkar : दोन दिवसांपूर्वी बंडखोरांना 'उंदीर' म्हणणारे शिवसेनेचे 'अर्जुन' शिंदे गटात?; चर्चेला उधाण