ETV Bharat / city

ट्रक-बस जाळण्यापेक्षा स्वतःचे विचार ज्वलंत करा - उपराष्ट्रपती

आंदोलन करताना सार्वजनिक वाहने जाळणे, ट्रक-बस जाळण्यापेक्षा स्वतःचे विचार ज्वलंत करा, असे वक्तव्य भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नागपूर येथे केले.

Venkaiah Naidu
व्यंकय्या नायडू
author img

By

Published : Jan 10, 2020, 4:23 PM IST

नागपूर - मातृभाषेचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे. देशात विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत असावे. अगोदर मातृभाषेला महत्व द्या. मात्र, त्यासोबतच इतर भाषासुद्धा वापरा असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. यासोबतच देशात बस, ट्रेन जाळण्यापेक्षा आपल्या कल्पना, विचार प्रज्वलित करा. देशात शांती ठेवा, असेही त्यांनी सांगितले. नागपुरात कवी कालिदास संस्कृत विश्व विद्यापीठाच्या तीन दिवसीय अधिवेशन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी उपराष्ट्रपती बोलत होते.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... Jamia CAA protest: आधी घोषणांनी रस्ते रंगवले, आता विद्यापीठातच 'डिटेन्शन सेंटर' बनवलं

आपल्या देशातील 200 भाषा लुप्त होत चालल्या आहेत. हा चिंतेचा विषय आहे. आपल्या स्थानीय भाषेचा वापर करावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. भारताचा इतिहास सगळ्या विद्यार्थ्यांना शिकविला पाहिजे. प्रत्येक प्रांतातील इतिहास मुलापर्यंत पोहोचला पाहिजे. विद्यार्थ्यांना सगळ्याच प्रकारचे शिक्षण मिळाले पाहिजे. त्याचप्रमाणे संस्कृती, इतिहास, भाषा यांचे ज्ञान दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... निर्भया प्रकरण: 'जर मला फाशी झाली तर माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल'

भारतीय संस्कृती ही नेहमीच जागांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. देशात राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यासाठी आपली आद्य भाषा नेहमीच महत्वाची भूमिका निभावता आली आहे. संस्कृतला जनसामान्यांची भाषा बनवायला हवी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा... मराठवाड्याच्या भूमिपुत्राचा साहित्य संमेलनात विसर; 'उचल्या' कार लक्ष्मण गायकवाडांना साधे निमंत्रणही नाही

वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या वेशभुषा असल्या, तरीही आपला देश एक आहे. हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. असे उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत उपस्थित होते.

Intro:नागपूर

ट्रक बस जाळन्या पेक्षा स्वतःचे विचार ज्वलंत करा- व्यंकय्या नायडू

मातृभाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे.मातृभाषेचा आदर प्रत्येकाने करावा. देशात विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतू द्यावे. आधी मातृभाषेला महत्व द्या सोबत इतर भाषा सुद्धा वापरा अस मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं सोबतच देशात बस, ट्रेन जाळण्यापेक्षा आपल्या कल्पना प्रज्वलित करा
देशात शांती ठेवा असंही त्यांनी सांगितलं ते नागपुरात कवी कालिदास संस्कृत विश्व विद्यापीठाच्या तीन दिवसीय अधिवेशन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते ..Body:आपल्या देशातील 200 भाषा लुप्त होत चालल्या हा चिंतेचा विषय आहे आपल्या स्थानीय भाषेचा वापर करावा अशी विनंती त्यांनी केली भारताचा इतिहास सगळ्या विद्यार्थ्यांना शिकविला पाहिजे प्रत्येक प्रांतातील इतिहास मुलानं पर्यंत पोहचला पाहिजे
विधर्थ्यांना सगळ्याच प्रकार च शिक्षण मिळालं पाहिजे , त्यात संस्कृती ,इतिहास ,भाषा यांचं ज्ञान दिल पाहिजे ..
भारतीय संस्कृती ही नेहमीच जागांसाठी आकर्षणाच केंद्र राहिली ..देशात राष्ट्रवादी भावना निर्माण करण्या साठी आपल्या आद्य भाषा नेहमीच महत्वाची भूमिका निभावत आली आहे.. संस्कृतला जन सामान्यांची भाषा बनविले पाहिजे , याचा प्रचार करा म्हणजे सर्व सामन्यांना कळेल
अनेक भाषेत संस्कृत आहे ,संस्कृत ही कुठल्या जाती ची भाषा नाही, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही.. अलग भाषा अलग वेष असला तरी आपला देश एक आहे हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे असं उपराष्ट्रपती नि सांगितलंConclusion:या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूर चे पालकमंत्री नितीन राऊत उपस्थित होते त्यांनी सुद्धा संस्कृत विद्यापीठ किती महत्वाची भूमिका निभावत आहे हे सांगितलं

बाईट - व्यंकय्या नायडू - उप राष्ट्रपती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.