नागपूर - लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेच्या विरोधात काल (सोमवारी) महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. नागपूरसह विदर्भात बंदला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलकांनी बळजबरीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी नागपूर शहरातील सीताबर्डी पोलिसांनी तीनही पक्षातील नेत्यांसह शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी काल (सोमवारी) सीबीआयच्या एका टीमकडून कारवाई करण्यात आली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले. काही कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, सीताबर्डी पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - Special: संघात महिलांच्या सहभागाबाबत आरएसएस अभ्यासकाने सांगितला 'हा' पूर्व इतिहास
हेही वाचा - Bhavana Gawli ED case : सईद खानच्या चौकशीसाठी ईडीचे पथक पुन्हा वाशिममध्ये दाखल