नागपूर - देशात आझादी का अमृत महोत्सव वर्ष ( Azadi Ka Amrit Mahotsav ) साजरा होत आहे. पण ब्रिटिश राजवटीतून मुक्त करत भारत स्वातंत्राच्या लढा देण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. याच हुतात्म्यांच्या आठवणीत ऐतिहासिक महत्व असलेल्या लढ्याला ऑगस्ट क्रांती दिनानिमित्य ( August Revolution Day ) आठवण केली जाते. हा लढा देतांना सेवाग्राम आश्रमाचेही ( Sevagram Ashram ) विशेष महत्व होते. याच ऑगस्टक्रांतीची महत्वाची बैठक सेवाग्राम आश्रमात झाली. याचाच आढावा घेऊन ईटीव्ही भारताच्या विशेष रिपोर्टमध्ये
सेवाग्राम येथे आश्रम स्थापन - माहात्मा गांधीनी ( Mahatma Gandhi ) इंग्रजांपासून ब्रिटिश राजवटीला उलटून टाकण्यासाठी देशाचा मध्यमबिंदू असलेल्या खेड्यात जाऊन लोकांना अहिंसेच्या मार्गाने लढा देण्याच्या कार्याला सुरवात केली. यासाठी महात्मा गांधी हे 1933-34 मध्ये वर्धा ( Wardha ) म्हणजेच तत्कालीन पालकवाडीला आल्याची नोंद आहे. सुरवातीला 1935 मध्ये मगनवाडी आजचे एमगिरी केंद्र येथे एका खोलीत राहिले. त्यानंतर सेवाग्राम रोडवरील पहिले सत्याग्रही आश्रम म्हणजेच आजचे महिलाश्रमात राहिले. त्यानंतर मिस लेड म्हणजेच मिराबेन यांनी शोधलेली शांत जागा म्हणजेच तत्कालीन शेगाव आजचे सेवाग्राम येथे आश्रम स्थापन झाले. त्या आश्रमातच हे आदिनीवास कुटी अत्यंत महत्वाच्या बैठकी झाल्या होत्या. याच ठिकाणी ऐतिहासिक आगस्ट क्रांतीतील भारत छोडो आंदोलनाची बैठक झाली. यामागे सुद्धा स्वातंत्र्य लढ्याच्या राजधानीचे खास वैशिष्ट्य आहे.
साबरमती ते सेवाग्राम...साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला ( Dandi Yatra ) निघाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साबरमतीला परतणार नाही असा निर्णय महात्मा गांधींनी घेतला होता. दांडीयात्रे दरम्यान इंग्रजांनी गांधीजींना दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. गांधीजी जेव्हा बाहेर आले तेव्हा देशाच्या मध्यभागी असलेल्या एखाद्या गावाला स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचे केंद्र बनवावे असे ठरले. यात महात्मा गांधीजींचे मानसपुत्र असलेल्या जमनालाल बजाज ( Jamnalal Bajaj ) यांनी वर्ध्यात येण्याचा आग्रह केला. याच सेवाग्राम आश्रमातून होणारा पत्रव्यवहार, लेख हे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे दस्तावेज या ठिकाणावरून गांधीजींनी लिहिलेले आहे. माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक ( My experiments with truth ) सुद्धा त्यांनी इथेच केले आहे. तसेच देशभरातील मान्यवर मंडळींना किंवा महत्वाचे पत्र लिहिण्याचे काम त्याचे महादेव भाई देसाई यांनी बापूंच्या दप्तर येथून केले आहे.
ऑगस्ट आंदोलनाची बैठक सेवाग्राम आश्रमातील आदी निवास कुटीत झाली...भारताला स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्ष पूर्ण होताना. या स्वातंत्र लढ्यात गांधींच्या सत्य अहिंसेचा शस्त्र हे इंग्रजांविरोधात तलवार, बंदुकीपेक्षा अधिक ताकदवर ठरले. यात सेवाग्राम लढ्याची राजधानी ठरली. पुणे, मुंबई, दिल्ली या तीन शहरासह सेवाग्राम आश्रमात अनेक महत्त्वाच्या बैठकी चर्चा झाल्या. यात भारत छोडो हा नारा ( Quit India slogan ) 8 ऑगस्ट 1942 मध्ये मुंबईत दिला. पण या संदर्भात महत्वाची बैठक सेवाग्राम आश्रमातया संदर्भात जवळपास तीन ते चार बैठकी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या ( Congress Working Committee ) बैठकी सेवाग्राम आश्रमात झाल्यात. या बैठकीला जवाहरलाल नेहरू ( Jawaharlal Nehru ) , सरदार वल्लभभाई पटेल, ( Sardar Vallabhbhai Patel ) खान अब्दुल गफ्फार खान ( Khan Abdul Ghaffar Khan ) , यासह अनेक नेते उपस्थित होते. यात महत्वाची बैठक 9 जुलै 1942 ला सेवाग्राम आश्रमात पार पडली. यात प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. ज्यात या महत्वपूर्ण आंदोलन त्याची रूपरेषा मसुद ठरवण्यात आला होता.
हेही वाचा - N V Ramana : देशाच्या सरन्यायाधीशांनी सर्वाधिक न्यायाधिशांची नियुक्ती करत रचला इतिहास
ब्रिटिश राजवटीला हादरा बसला....देशभर हे आंदोलन पेटून उठले. इंग्रजानो भारत छोडो या नाऱ्याने ब्रिटिश राजवटीला मोठा धक्का बसला. या आंदोलनाची चर्चा इंग्लडमध्ये ब्रिटिश राजवटीपर्यंत जाऊन पोहचली. या आंदोलनाचे उग्र स्वरूप पाहता भारतीयांना ब्रिटिश राजवट उलटुन टाकण्याचा विश्वास बसला. यामुळे ब्रिटिशांची मनात असलेली भीती निघून गेली. पण ही भितो निघताना अनेकांना आपल्या जीवाचे बलिदान दिले.
'भारत छोडो' हा शब्द आला कुठून... 'भारत छोडो' हा शब्द चले जाव यावरून घेण्यात आला. मुंबई बंदरावर युसूफ मेहर अली, त्यांच्या सहकाऱ्यांनी सायमन कमिशनला गो बॅकचे फलक ( Go back to the Simon Commission ) दाखवले होते. सायमन आले पण त्यांना परत जावे लागले. ब्रिटिशांनी भारत सोडावे यासाठी निर्वाणीचा इशारा देत आंदोलन करण्यात येणार होते. यासाठी आंदोलनाला काय नाव द्यावे यावर चर्चा झाली. बापूंना सर्वांना समजेल सोपा शब्द अपेक्षित होता. युसूफ अली यांनी वापरलेला 'गो बॅक, क्विट इंडिया' हा शब्द सुचविला. बापूंनी तो मान्य करून पुढे 'भारत छोडो' क्विट इंडिया' हा शब्द पुढे आला. आंदोलनांला भारत छोडो आंदोलन असे नाव मिळाले. तेच आंदोलन ऑगस्ट क्रांती म्हणून अजरामर झाले. याच 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिवस आपण आठवण करत त्या हुतात्म्यांना अभिवादन करतो. त्यांच्या बलिदानामुळेच आपल्याला आज स्वातंत्र्य मिळाले त्यामुळेच आपण आज अमृतमहोत्स साजरा करत आहोत.
हेही वाचा - CWG 2022 :अचंता शरथ कमलने रचला इतिहास; लियाम पिचफोर्डवर मात करत घेतली 'गोल्डन' भरारी