ETV Bharat / city

बारावीचा निकाल जाहीर! नागपूर विभागाची मागील वर्षाच्या तुलनेत समाधानकारक कामगिरी - HSC EXAM RESULT 2020

नागपूर विभागात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १,५६,८७७ इतके विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १,४३,७७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यानुसार नागपूर राज्यात विभागाला ९१.६५ टक्के पर्यंत मजल मारता आली.

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Nagpur Division
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभाग
author img

By

Published : Jul 16, 2020, 3:14 PM IST

नागपूर - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात नागपूर विभागाने समाधानकारक कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. २०१९पेक्षा २०२० या वर्षातील कामगिरी सुधारल्याचे दिसत आहे. नागपूर विभागातून गोंदिया जिल्ह्याने ९४.१३ टक्के गुण घेत बाजी मारली आहे. तर सर्वात कमी कामगिरी ८७.४० टक्के इतकी वर्धा जिल्ह्याची आकडेवारी आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांची प्रतिक्रिया..

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात राज्यात नागपूर विभागाने ९१.६५ टक्के गुण घेत समाधानकारक कामगिरी केल्याचे दिसून आले. संपूर्ण नागपूर विभागात एकून ६ जिल्हे आहेत. यापैकी गोंदिया जिल्ह्याने यावर्षी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागातून सर्वाधिक ९४.१३ टक्के गुण घेत आपला झेंडा रोवल्याचे दिसून आले. तर सर्वात कमी ८४.४० टक्के इतक्या गुणातच वर्ध्याला समाधान मानावे लागले. दरम्यान बारावीच्या निकालाची उत्सुकता आणि धाकधूक पालक आणि विद्यार्थ्यांना लागली होती. त्यामुळे निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनीदेखील सुटकेचा नि: श्वास सोडल्याचे दिसून आले.

हेही वाचा - बारावीचा राज्याचा निकाल 90.66 टक्के... यंदाही मुलींचीच बाजी!

नागपूर विभागाने दिलेल्या माहितीनुसार विभागात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १,५६,८७७ इतके विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १,४३,७७२ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार नागपूर राज्यात विभागाला ९१.६५ टक्के पर्यंत मजल मारता आली. नागपूर विभागाची मागील वर्षाची आकडेवारी ८२.५१ टक्के इतकी होती तर यावर्षी मात्र त्यात वाढ झाल्याने विभागाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. नागपूर विभागाच्या बारावीच्या उत्तीर्ण निकालावर जिल्हा निहाय नजर टाकल्यास भंडारा - ९३.५८ टक्के, चंद्रपूर - ९०.६० टक्के, नागपूर - ९२.५३ टक्के, वर् धा- ८७.४० टक्के, गडचिरोली - ८८.६४ टक्के तर गोंदिया - ९४.१३ टकेक अशी आकडेवारी नागपूर विभागाकडून पुढे आली आहे. त्यामुळे नागपूर विभागातील कामगिरी इतर विभागाच्या तुलनेत समाधानकारक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.