नागपुर: गुरे आणि जनावरांमध्ये लम्पि आजाराचा Lumpy skin disease विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत असताना आता वन्यप्राण्यांमध्ये सुद्धा लम्पि सदृश्य आजराचे लक्षण दिसत आहे. राजस्थानच्या बाडमेर येथे 35 हरणांमध्ये लम्पिचे लक्षण दिसून आल्यानंतर आता देशभरात असलेल्या प्राणिसंग्रहालय अलर्ट Zoo Alert झाली आहेत. नागपूर येथील प्रसिद्ध महाराजबाग प्राणी संग्रहालय Maharaj Bagh Zoo प्रशासनाने सुरक्षेचे उपाय करण्यात सुरुवात केली आहे. ज्या पिंजऱ्यात हरीण, निलंगाय ठेवण्यात आले आहेत. त्याठिकाणी जंतू नाशक पावडर टाकले जातं आहे. एवढंचं नाही तर दिवसातून 2 वेळा फिनाईलची फवारणी केली जाते आहे. अद्याप तरी कोणत्याही प्राण्यांमध्ये लम्पि सदृश्य आजाराचे लक्षण दिसून आलेले नाहीत. तरीदेखील महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावसकर यांनी दिली आहे.
कोरोना काळात वन्य प्राण्यांना कोरोना विषाणूंची लागण होऊ नये. यासाठी खबरदारी घेण्यात येत होती. तीच प्रक्रिया अजूनही पाळली जात आहे. महाराजबागेतील प्रत्येक प्राण्यांचा पिंजरा आणि परिसर वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याने लम्पिचा धोका कमी असला, तरी योग्य काळजी घेतली जात आहे. अशी माहिती डॉ सुनील बावसकर यांनी दिली आहे.
महाराजबागमध्ये असलेले प्राणी मध्य भारतातील सर्वात प्रसिद्ध महाराजबाग प्राणीसंग्रहालय आजच्या परिस्थितीत एकूण 400 पशु आणि पक्षी आहेत. त्यामध्ये 2 वाघ, 4 बिबट, 4 अस्वल ,11 निलगाय, 13 काळवीट, 33 चितळ आणि 35 हरिणांसह 300 प्रकारचे पक्षी आहेत.
प्राणांच्या हालचालींवर विशेष लक्ष वन्यप्राण्यांमध्ये लम्पि आजाराचे लक्षण दिसून येत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर महाराजबाग प्राणीसंग्रहालय प्रशासनाने प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. अशक्त प्राण्यांमध्ये लम्पि आजाराचा प्रादुर्भाव वेगाने होण्याची शक्यता असल्याने प्राण्यांच्या डाएट देखील विशेष लक्ष दिले जात आहे.