ETV Bharat / city

Loudspeaker Sale in Nagpur : भोंग्यावरून 'राज'कारण; ट्रेंड बदलत असल्याच्या भोंगा विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया - महाराष्ट्रात भोंगावरून राजकारण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray on Loudspeakers) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथे केलेले भाषण आणि त्यावेळी केलेली भोंग्यांबाबतची घोषणा (Maharashtra loudspeaker controversy) यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. यातच बाजारात भोंग्याची विक्री वाढली (Loudspeaker Sale in Nagpur) तर काही ठिकाणी दुकानात येत्या आठ दहा दिवसांत नवीन भोंगे पाहिजे अशी मागणी दर्शवली आहे.

nagpur Loudspeaker
नागपूर भोंगा
author img

By

Published : Apr 20, 2022, 9:12 PM IST

नागपूर - राज्यात भोंग्यावरून 'राज'कारण चांगलेच ढवळून निघाले (Maharashtra Loudspeaker Controversy) आहे. यातच बाजारात भोंग्याची विक्री वाढली (Loudspeaker Sale in Nagpur) तर काही ठिकाणी दुकानात येत्या आठ दहा दिवसांत नवीन भोंगे पाहिजे अशी मागणी दर्शवली आहे. पण पूर्वीच्या तुलनेत भोंगे आता सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कमीच लावले जात आहे हेही खरे आहे. या चार आठ दिवसात जरी विक्री काही प्रमाणात वाढली हे खरे असले तरी या व्यवसायात काम करणारे सांगतात. लोकांचा कल आता कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाऐवजी स्पष्ट आवाज असणारे साऊंड सिस्टमकडे अधिक आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

नागपुरात केशवानंद साऊंड सिस्टमच्या माध्यमातून खोब्रागडे यांची तिसरी पिढी या क्षेत्रात काम करत आहे. याच तिसऱ्या पिढीतील परिमल खोब्रागडे हे सांगतात, आज या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. जेव्हा वडीलांचा काळ होता तेव्हा मात्र भोंग्यांचे सुगीचे दिवस होते. पण आज ते राहिले नाही. पूर्वी कुठलाही मोठा कार्यक्रम असला की भोंग्याची मागणी असायची. एका कार्यक्रमाला 100 ते 150 भोंगे असायचे, मग तो राजकीय सभा असो की मंदिर, मशीद, सण उत्सवाचे कार्यक्रम. पूर्वी गावात मंदिरात भोंगा लावून भजन कीर्तनाचे कार्यक्रम होते. कारण त्यावेळी आवाज दूरवर जावा, मोठ्याने जावा ही मागणी असायची. पण आजही मागणी आता बदलून आवाजाच्या गुणवत्तेकडे जास्त आहे. त्यामुळे डीजे सारखे नवीन ट्रेंड पाहायला मिळतो.

हेही वाचा - Loudspeaker Sales Hike in Mumbai : राजकीय भोंग्यात मुंबईतील भोंगे विक्रेत्यांना 'अच्छे दिन'; विक्री वाढली

नागपुरात भोंग्याची विक्री करणारे काय सांगतात - नागपूरच्या शनी मंदिर परिसरात अनेक भोंगे विक्रेते दुकानदार आहेत. यात काहींनी भोंग्याची विक्री संदर्भात मागील काही दिवसात जयंतीच्या काळात भोंगे विक्री झाली. काही जण आपआपल्या गरजेनुसार त्यात्या कामासाठी खरेदी करतात, असे सांगितले. पण खूप विक्री वाढली असे नाही. काहींनी बोलण्यास नकार दिला. तेच काहीं दुकानदारांनी विक्री नसल्याचे उत्तर दिले. यातील एका भोंगे विक्रेते यांनी मागील पाच ते सहा दिवसात काही लोकांनी भोंगे पाहिजे असे म्हणत भाव विचारून पाच ते दहा दिवसांनी लागेल असे उत्तर दिले. विक्री झाली नसली तरी विचारणा झाली हे मात्र खरे.

भोंग्याचा आजच्या घडीला उपयोग कुठे केला जातो - यावर केशवानंद साऊंड सिस्टमकडून भोंगे हे कार्यक्रमासाठी भाड्याने लावून देण्याचे काम केले जाते. यात काही धार्मिक कार्यक्रम किंवा शोभा यात्रा मिरवणूक असल्यास भोंगे लावले जातात. किंवा स्पीकरच्या तुलनेत थोडे स्वस्त असल्याने त्याचा पर्याय निवडतात, असेही परिमल यांनी ईटीव्हीशी बोलतांना सांगितले. शहरात शासकीय कार्यक्रम किंवा दवंडी स्वरूपात जाहिरात देण्यासाठी अनाऊन्सर लोक हे एका रिक्षावर बांधून याचा उपयोग करतात.

भोंगे न वापरण्यामागे काय आहे 'राज' काय आहे 'कारण'- पूर्वी राजकीय कार्यक्रमात टॉवर तयार करून आवाज दूरवर जावा म्हणून एका टॉवरवर 10 ते 15 भोंगे लावले जायचे. पण आता सुस्पष्ट आवाज आणि कानठळ्या बसवणारे आवाज नको म्हणून अधिक पैसे मोजून साऊंड सिस्टम लावता. त्यामुळे राजकीय वातावरण भोंग्यावरुन तापत असले तरी काही ठिकाणी याचा उपयोग कमीच झाला आहे. या मागचे 'राज'कारण नसून लोकांना कानठळ्या बसवणारा आवाज नको आहे. पण यात एकीकडे काहींना हाच आवाज पाहिजे असेही आहे. कोर्टाच्या आदेशाचे पालन करून आवाजात भोंगे वाजवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून काय भूमिका असणार आणि राजकीय पक्षांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Loudspeaker Sale Hike in Amravati : अमरावती जिल्ह्यात भोंग्यांची मागणी वाढली; विक्रीमध्ये 30 टक्के वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.