नागपूर- उपराजधानीत कोरोनाने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर रात्री 8 वाजल्यापासून रस्त्यांवरची गर्दी कमी होताना दिसून आली. रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलीस प्रशासनाचे वाहने फिरू लागताच लगबगीने दुकाने बंद होताना दिसून आली.
नागपूरातील कोरोनाची परिस्थिती पाहता दररोज 6 हजारांच्या घरात कोरोनाबाधित मिळून येत आहेत. तर दररोज 60 कोरोनाबधितांचा मृत्यू होत आहे.
हेही वाचा-भंडारा : जमिनीच्या वादातून प्रॉपर्टी डीलरची हत्या, 3 आरोपींना अटक
नागपूरच्या इतवारा बाजार परिसरात रात्री पोलिसांचे वाहन फिरत होते. यावेळी गर्दीचा परिसर असलेल्या भागात अत्यावश्यक सेवा तसेच फळ विक्रेत्यांनी घरी जाण्यास सुरुवात केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत लोकांनी घरात राहून लॉकडाऊनला सहकार्य करा, असे आवाहन केले जात आहे. कामाशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन या लॉकडाऊनच्या निमित्याने केले जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरात राहून सुरक्षित राहावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा-पुण्यात संचारबंदीची अंमलबजावणी सुरू, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
व्यापाऱ्यांचा कडक निर्बंधाला विरोध-
राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले असताना शहरात व्यापारी वर्गाने विरोध केला आहे. सरकारचे निर्बंध हे जीवावर उठले असल्याचा आरोप करत सोमवार ते शुक्रवारी व्यापाऱ्यांनी निदर्शने केली आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबधितांची परिस्थिती पाहता रुग्णसंख्या अजूनही आटोक्यात आली नाही. उलट कोरोनाची परिस्थिती बिकट होताना दिसून आली आहे. बुधवार सायंकाळीपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर पुन्हा लागलेल्या निर्बंधांचे पालन करण्यात येते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.