ETV Bharat / city

जनता कर्फ्यू : जनजागृती अभावी जनता कर्फ्यूला नागरिकांचा कमी प्रतिसाद

शहरातील दुकाने शंभर टक्के बंद असली तरी अनेकजण कामानिमित्ताने घराबाहेर पडलेले आहेत. यासंदर्भात काही नगरिकांशी आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी बातचीत केली, तेव्हा अनेकांनी जनता कर्फ्यूसंदर्भात फारशी माहिती नसल्याचे मत व्यक्त केले तर, काहींनी यासाठी योग्य जनजागृती झाली नसल्यानेच नोकरदारवर्ग घराबाहेर पडल्याचे मत व्यक्त केले.

जनता कर्फ्यु
जनता कर्फ्यु
author img

By

Published : Sep 19, 2020, 3:47 PM IST

नागपूर - शहरात सुरू झालेल्या जनता कर्फ्यु दरम्यान चाकरमाने मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. प्रशासनाकडून योग्य जनजागृती केली नसल्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाल्याचे अनेक नागरिकांनी म्हटले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी जनता कर्फ्यूची मागणी केली होती. त्यानुसार जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले.

शहरातील दुकाने शंभर टक्के बंद असली तरी नोकरदार कामानिमित्ताने घराबाहेर पडलेले आहेत. यासंदर्भात काही नगरिकांशी आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी बातचीत केली, तेव्हा अनेकांनी जनता कर्फ्यूसंदर्भात फारशी माहिती नसल्याचे मत व्यक्त केले तर, काहींनी यासाठी योग्य जनजागृती झाली नसल्यानेच नोकरदारवर्ग घराबाहेर पडल्याचे मत व्यक्त केले.

नागपुरात जनता कर्फ्युला नागरिकांचा कमी प्रतिसाद

जनता कर्फ्यूच्या आवाहनावरून राजकारण होणे चुकीचे - विकास ठाकरे

जनता कर्फ्यूसंदर्भात महापौर संदीप जोशी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी केलेल्या आवाहनानंतर झालेले राजकारण दुर्दैवी असल्याचे मत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर सर्व पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी नागपुरकारांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी एक ट्विट करत जनता कर्फ्यू बंधनकारक नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर पोलीस विभागाकडून सुद्धा कोणत्याही प्रकारची कठोरता केली जाणार नसल्याचे पत्र काढल्यामुळे जनतेमध्ये जनता कर्फ्यूसंदर्भात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. जनता कर्फ्यूचे आवाहन नागपूरकरांच्या आरोग्यसाठी करण्यात आले होते, त्यात राजकारण करण्याची गरज नव्हती असेही ते म्हणाले आहेत.

जनता कर्फ्यू फेल व्हावा म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला - महापौर संदीप जोशी

नागपूर शहरात जनता कर्फ्यूचे आवाहन झाल्यापासून त्यावर सुरू झालेल्या राजकारणाचा थेट प्रभाव हा जनता कर्फ्यूवर दिसून आलेला आहे. एकीकडे, व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला भरभरून प्रतिसाद दिला असताना जनता मात्र कामधंद्याच्या निमित्ताने घराबाहेर पडल्याचे चित्र बघायला मिळाले. यासंदर्भात नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी बातचीत केली, तेव्हा त्यांनी जनता कर्फ्यू फेल व्हावा, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र, जनता ही रस्त्यांवर दिसत आहे. रोजच्या इतकी गर्दी नसली तरी, काही प्रमाणात लोक बाहेर पडले आहेत. लोकांनी कोरोनाची भयावह परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. मात्र, यावर सुरू असलेल्या राजकारणामुळेच लोकांनी जनता कर्फ्यूला गंभीरपणे घेतले नसल्याचे ते म्हणाले आहेत. जनता कर्फ्यू अपयशी करण्यासाठी प्रशासनातील आणि विरोधी पक्षातील काही लोकांनी गप्प न बसता जनता कर्फ्यू बंधनकारक नसल्याची दवंडी पिटली. ते काही करू शकत नव्हते तर, त्यांनी गप्प राहून तरी सहकार्य करायला पाहिजे होते. मात्र त्यांच्या 'बोलावत्या धन्या'कडून मिळालेल्या आदेशाचे पालन करत त्यांनी जनता कर्फ्यूच्या विषयावर राजकारण केले. ज्यामुळे आज काही प्रमाणात लोक घराबाहेर पडल्याचे बघायला मिळत असल्याचे महापौर संदीप जोशी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.