नागपूर - नागपूरमध्ये रविवारी जोरदार पाऊस ( Heavy rain in Nagpur ) झाला. माहुरझरी गावात ( Mahurzari village In Nagpur ) मुसळधार पावसामुळे अनेक प्राणी पाण्याच्या ठिकाणी अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी बचाव पथकाकडून ( Rescue team ) प्रयत्न करण्यात आले आहेत. असाच एक व्हिडीओ नागपूरमधून समोर आला आहे. तब्बल सात दिवसांपासून एक वानर पाण्यात अडकले होते ( monkey stuck in water from seven days ). त्याला वाचवण्यासाठी २०० मीटर लांबीचा कृत्रिम पूल बचाव पथकाकडून तयार करण्यात आला ( artificial bridge made to rescue animal) आहे.
टॉवरमधून माकडांना वाचवण्याचे प्रयत्न - नागपूर जिल्ह्यातील माहुरझरी गावात मुसळधार पावसामुळे पाण्याने वेढलेल्या टॉवरमधून वानरांना वाचवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू ( water logged electricity tower in Nagpur ) आहेत, असे वन अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले आहे. नागपूरमध्ये गेल्या आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर ( Flooded rivers and streams ) आला आहे. त्याचा परिणाम वन्य प्राण्यांवर पहायला मिळत आहे. बांबू, पत्रे, जाळी, वाळलेल्या झाडाच्या फांद्या आणि रिकाम्या ड्रमचा वापर करून २०० मीटर लांबीचा कृत्रिम पूल बनवण्यात आला आहे.
रविवारपासून प्रयत्न सुरू - रविवारपासून अडकलेल्या प्राण्यांना दोरी आणि बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र अद्याप यश आले नसल्याचे त्यांनी सांगितले. बांबूचे पत्रे, जाळी, वाळलेल्या झाडाच्या फांद्या आणि रिकाम्या ड्रमचा वापर करून पुराच्या पाण्यावर आता 200 मीटर लांबीचा कृत्रिम पूल बनवण्यात आला आहे, असे राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांनी सांगितले. टॉवरवरून खाली आल्यानंतर जमिनीवर जाण्यासाठी पुलाचा वापर करतील, असेही त्यांनी सांगितले आहे. वनविभागाचे कर्मचारी, नागपूर महानगरपालिकेचे अग्निशामक दल, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ आणि येथील वन्य प्राण्यांसाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर या प्राण्यांच्या सुटकेसाठी संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत.