ETV Bharat / city

अल्पवयीन मुलीला तिच्या अंघोळीचा व्हिडिओ दाखवत केले अपहरण, बलात्कारानंतर मागितली ३ लाखांची खंडणी - नागपूर पोलीस

अपहरण केल्यानंतर आरोपींनी मुलीला सिगारेटचे चटके देखील दिले. एवढेच नाही तर अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी तिच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली होते, असे मुलीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

मानकापूर पोलीस
मानकापूर पोलीस
author img

By

Published : Sep 2, 2021, 4:06 PM IST

Updated : Sep 2, 2021, 4:36 PM IST

नागपूर - परिचयाच्या तीन आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ दाखवून अपहरण केल्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अपहरण केल्यानंतर आरोपींनी मुलीला सिगारेटचे चटके देखील दिले. एवढेच नाही तर अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी तिच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली होते, असे मुलीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

माहिती देतांना पोलीस अधिकारी

ही घटना नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ दरम्यानची आहे. या पैकी मुख्य आरोपी हा पीडित तक्रारदार मुलीच्या नातेसंबंधातील आहे. सलग सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ आरोपी हे पीडित मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. आरोपींच्या रोजच्या जाचाला कंटाळून पीडित मुलीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बुधवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्याच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मंगेश घोडके, निलेशसिंग ठाकूर आणि आकाश नावाच्या या तिघांचा समावेश आहे. या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी असल्याची शक्यता असून त्यांना देखील अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तीन लाखांची खंडणी मागितली -

आरोपींनी मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला निर्जनस्थळी घेऊन गेले. त्याठिकाणी तिला बळजबरीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी तिला दिली होती. मात्र एवढी मोठी रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी तिला घरात चोरी कर आणि आम्हाला टप्या-टप्याने पैसे दे अन्यथा तुझी बदनामी करू, अशी धमकी दिली होती.

हेही वाचा - नागपूरकर डेंग्यूने त्रस्त, महापौर मात्र रेडिओ जॉकी बनण्यात व्यस्त - काँग्रेस

Last Updated : Sep 2, 2021, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.