नागपूर - कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर उपराजधानी नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भाचे सांस्कृतिक वैभव ठरलेला खासदार सांस्कृतिक महोत्सव यंदा 17 ते 26 डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. बॉलिवूड सुपर स्टार संजय दत्त याच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
हेही वाचा - Nagpur MLC elections 2021 : नाट्यमय घडामोडीनंतर मतदान प्रक्रिया सुरू
सुरवातीला खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव निश्चित झाले होते. अमिताभ बच्चन नागपूरला येण्यासाठी उत्सुक होते, मात्र तब्येतीच्या कारणाने त्यांनी असमर्थता दर्शवल्याने आता संजय दत्तच्या हस्ते खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित यावेळस खासदार सांस्कृतिक महोत्सवाची आखणी करण्यात आली आहे. देशातील आघाडीचे कलाकार नागपुरातील खासदार महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत. नागपूरकरांना 17 ते 26 डिसेंबरदरम्यान संगीत, नाट्य यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी राहणार आहे.
हेही वाचा - Mahaparinirvan Day 2021 : भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना...