नागपूर - एखाद्या दिवशी गडकरींच्या विरोधातच सीबीआयचा वापर होऊ नये अशी शंका व्यक्त करत काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये गडकरी यांचे खच्चीकरण सुरू असल्याकडे लक्ष वेधले. Kanhaiya Kumar तसेच, केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणाच वापर करत असल्याचा हल्ला चढवला आहे. ते नागपुरात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त आज शनिवार दि. 20 ऑगस्ट रोजी नागपुरात काही काँग्रेस नेत्यांनी टेक्नॉलॉजी यात्रेचे आयोजन केले होते. त्यासाठी ते आले असता माध्यमांशी ते बोलत होते.
लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही रॅली त्यात सहभागी होण्यासाठीच कन्हैय्या कुमार नागपुरात आले. युवा है जोश में लायेंगे इन्हे होश में या घोषवाक्य सह काढण्यात आलेल्या रॅलीच्या माध्यमातून देशाला विकणाऱ्यांच्या विरोधात लोकांना जागे करण्याचे काम करणार असल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले. Kanhaiya Kumar's visit to Nagpur आज देशासमोर बेरोजगारी, महागाई हे आव्हान आहे, शासकीय कंपन्या विकल्या जात आहे. हे सर्व थांबवायच्या असेल तर लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले.
गडकरींच्या विरोधातही सीबीआयचा वापर केंद्रीय एजन्सीचा वापर देशाच्या सुरक्षेसाठी करण्याऐवजी केंद्र सरकार स्वतःची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर केला जात आहे. आम्हाला तर शंका आहे की एखाद्या दिवशी गडकरींच्या विरोधात ही सीबीआयचा वापर होतो की काय? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis उद्धव ठाकरेंनी केलेला भ्रष्टाचार मुंबईकरांसमोर मांडा, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा