ETV Bharat / city

यंदाचा 'जिजामाता विद्वत गौरव' पुरस्कार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जाहीर - नागपूर जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार

छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपुर व पुण्याच्यावतीने 40वा 'जिजामाता विद्वत गौरव' पुरस्कार भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. कोरोनामुळे मागील वर्षी खंड पडल्याने दोन्ही वर्षे मिळून हा पुरस्कार यंदा लतादीदींना देण्यात आला आहे.

nagpur jijamata Vidwat Gaurav award news

author img

By

Published : Sep 28, 2021, 10:20 AM IST

नागपूर - छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपुर व पुण्याच्यावतीने 40वा 'जिजामाता विद्वत गौरव' पुरस्कार भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. कोरोनामुळे मागील वर्षी खंड पडल्याने दोन्ही वर्षे मिळून हा पुरस्कार यंदा लतादीदींना देण्यात आला आहे. त्यांचा मुंबईत गौरव करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे यंदा मोठा कार्यक्रम नसल्याने वेळेवर याची तारीख जाहीर केली जाईल, असेही छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक शिवकथाकार प.पू. उपाख्य विजयराव देशमुख यांनी नागपूरात पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिक्रिया

असे असेल पुरस्काराचे स्वरुप -

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 93 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या प्रतिष्ठाने या पुरस्काराची घोषणा करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक प्रकारे शुभेच्छा भेट दिली आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख 51 हजार रुपये सन्मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असे असणार आहे. कोरोनामुळे पुरस्कार वितरणाचा जाहीर कार्यक्रम होणार नसला, तरी छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्यावतीने पुढच्या महिन्यात हा पुरस्कार लता मंगेशकर यांना मुंबईमध्ये दिला जाणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, पदमश्री हृदयनाथ मंगेशकर, सेतुमाधवराव पगडी, गो. नी. दांडेकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक दिवंगत बाळासाहेब देवरस, धुंडा महाराज देगलूरकर, पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पंडित महादेवशास्त्री, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. रामचंद्र देखणे, यांच्यासह 38 मान्यवरांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्काराने मागील 40 वर्षात सन्मानित करण्यात आले आहे. धर्म संस्कृती इतिहास आदी क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवत भारताचे नाव उंचावण्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जात असून दोन वर्षामिळून हा पुरस्कार भारतरत्न लाटा मंगेशकर यांना देण्यात येणार आहे.

हेही वाचा - किरीट सोमैया आज कोल्हापूर दौऱ्यावर; पोलिसांच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.