ETV Bharat / city

नागपूरमध्ये काँग्रेसकडून दोन सदस्यीय ठराव मंजूर, कार्यकर्त्यांमधून होणाऱ्या विरोधामुळे घेतला निर्णय - the three-member system in Congress

नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकासाठी राज्यात लागू केलेल्या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा काँग्रेस पक्षातून विरोध होऊ घातला आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन विषयाला धरून काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे यांनी काँग्रेस कमिटीची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत तीन सदस्यीय पद्धतीचा विरोध करत दोन सदस्य पद्धतीचा ठराव मंजूर करण्यात आला.

नागपूरमध्ये काँग्रेसकडून दोन सदस्यीय ठराव मंजूर, कार्यकर्त्यांमधून होणाऱ्या विरोधामुळे घेतला निर्णय

author img

By

Published : Sep 27, 2021, 9:22 AM IST

Updated : Sep 28, 2021, 1:38 PM IST

नागपूर - आगामी होऊ घातलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकासाठी राज्यात लागू केलेल्या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा काँग्रेस पक्षातून विरोध होऊ घातला आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन विषयाला धरून काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे यांनी काँग्रेस कमिटीची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत तीन सदस्यीय पद्धतीचा विरोध करत दोन सदस्य पद्धतीचा ठराव मंजूर करण्यात आला. सामान्य कार्यकर्ता आणि जनतेचा हिताचा विचार व्हावा अशीच भूमिका आमदार विकास ठाकरे यांनी यावेळी मांडली असल्याचे बोलेल जात आहे.

नागपूरमध्ये काँग्रेसकडून दोन सदस्यीय ठराव मंजूर, कार्यकर्त्यांमधून होणाऱ्या विरोधामुळे घेतला निर्णय

'तीन सदस्य प्रभाग पद्धतीला विरोध'

या नवीन तीन सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक लढण्याचा निर्णयाला विरोध होत आहे. सामान्य कार्यकर्त्यांचे यामध्ये नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांचा विचार जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठया संख्यने पदाधिकारी उपस्थित झाले. त्यामुळे या बैठकीत सर्वांनी तीन सदस्य प्रभाग पद्धतीला आपला विरोध दर्शवला. यामध्ये दोन सदस्यीय पद्धत लागू करावी अशी मागणी करण्यात आली.

'हिवाळी अधिवेशनात झाला होता नियम'

यामध्ये 2020 मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चार सदस्य असलेल्या प्रभाग पद्धतीला रद्द करत एक नगरसेवक वार्ड पद्धतीचा निर्णय माहाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, हा निर्णय घेतल्याने त्याला विरोध होत आहे. काँग्रेस पक्षाचा कणा समजल्या जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेत दोन सदस्यीय वार्ड झाला तर छोट्यातला छोट्या कार्यकर्त्यांला संधी मिळून त्याला नगरसेवक होण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे दोन सदसीय पद्धती योग्य असल्याचे म्हटले आहे. तीन सदस्य प्रभाग पध्दतीत सामान्य नागरिकांचे नुकसान करणारी असल्याचे यामध्ये म्हटले आहे. ही जे तीन सदसीय पद्धत आहे ती जनतेला सुद्धा सोपी ठरते, यात पदाधिकारी यांच्या मतानुसार एक सदस्य पद्धतीचा ठराव घेण्यात आला असून हा ठराव प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवला जाणार आहे.

'छोटा कार्यकर्ता कसा नेता बनेल याचाही विचार केला पाहिजे'

प्रदेश कार्यकरणीच्या बैठकीत तीन सदस्य प्रभाग पद्धतीला विरोध झाला आहे, त्याच भूमिकेला नागपूर शहरात अध्यक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापर्यंत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत पाठवले आहे. निर्णय काहीही होवो, पण ज्या छोट्या कार्यकर्त्याच्या मेहनतीने आमदार खासदार बनतात तो कार्यकर्ता कसा नेता बनेल याचाही विचार केला पाहिजे. हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षाच्या लोकांनी चर्चा करुन हा निर्णय घेतला होता. त्यामध्ये आता का बदल करण्यात आला? असा सुरू उमटताना दिसून आला.

Last Updated : Sep 28, 2021, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.