नागपूर - भाजपचे माजी खासदार अभिनेता शत्रुघ्न सिन्हा नागपुरात पत्रकार संघाच्या कार्यक्रमात आले होते. दरम्यान त्यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशावर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच बंगालच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. यात देशाचे पंतप्रधान यांच्या रॅलीवर ही शत्रुघ्न सिन्हा यांनी टीका केली. ते नागपुरात महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याच्या कर्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांचासोबत भाजपमधून बाहेर पडलेले माजी आमदार आशिष देशमुख सोबत होते.
मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये प्रवेश त्याचा अंतर्गत विषय आहे. तसे मिथुन चक्रवर्ती चांगले व्यक्ती व कलाकार आहेत, लोकप्रिय आहेत. त्यांना भाजपाणे राजकीय फायद्यासाठी आणले आहे. त्यांना अनेक राजकीय पक्षाचा अनुभव आहे.
बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले-
सध्या बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले असतांना ममता बॅनर्जी यांची एक लोकप्रियता आहे. यात त्यांना काँग्रेस आणि डाव्यांनकडून रॅली केली त्यातून मिळालेला पाठिंबा भाजपच्या रॅलीच्या तुलनेत काही कमी नव्हता. मंचावरून ज्या पद्धतीने चक्रवर्ती यांनी स्वतःला कोब्रा म्हटले त्याऐवजी त्यांनी राजकीय भाष्य केले असते तर अधिक योग्य झाले असते, असेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. शिवाय ममता बॅनर्जी यांचे तोंडभरून कौतुक केले. या सगळ्या प्रकारातून भाजप पक्षाला खूप काही फायदा होईल, असे वाटत नसल्याचेही ते म्हणाले.
ममता यांना लोकांची सहानुभूती आधीक मिळेल-
सिन्हा म्हणाले, ममता बॅनर्जी यांची नाला जमिनीशी जुळून आहे. लोक नेत्या आहेत. त्यांची वैयक्तिक व्यक्तिमत्व खूप चांगले आहे. त्यांना जनतेचा पाठिंबा आहे. महिलेला हताश करण्याच्या प्रयत्न सुरू असताना त्याचा परिणाम काही वेगळा होऊ नये. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगायचे झाल्यास त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत आहेत. यातून ममता यांना लोकांची सहानुभूती आधीक मिळेल, असेही ते म्हणालेत.
बिहारच्या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी ज्या पद्धतीने योगी पँटर्न वापरण्याची चर्चा होत आहे. यावर शत्रूघ्न सिन्हा यांनी योगी हाथर्स पॅटर्न बिहारमध्ये चालणार नाही. योगीजी हे मित्र आहेत. पण आधी त्यांनी यूपी सांभाळावे. यूपीत अजून तरी काही साध्य झाल्याचे दिसून येत नाही, असेही ते म्हणाले.
जखमेवर फुंकर घातली-
भाजपाने रॅली काढली. त्यात मोदींच्या भाषणात पाहीजेते ते मुद्दे दिसून आले नाहीत. देशात अनके ज्वलंत मुद्दे असतांना त्यांनी बोलून दाखवले नाही. वाढते गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ, दिल्लीत सुरू असलेला शेतकऱ्यांचा विषय आहे. मोठ्या अपेक्षा होत्या जखमेवर फुंकर घातली असती पण तसे काही झाले नसल्याचे सिन्हा म्हणाले.
काही लोक केंद्रीय एजन्सीचा गैरफायदा घेत आहेत. आपल्या मताशी काही लोक सहमत नसल्यास त्यांच्या मागे ईडी, सीबीआयच्या चौकशी लावल्या जात असल्याचे दिसून येत आहे. भारताचे चाणक्य शरद पवार यांच्यावर ईडी लावण्याचा प्रयत्न केला. त्याचाही परिणाम पाहिलेला आहे. या एजन्सीचा दुरुपयोग होत आहे. पण केल्यास बरे जाईल असेही ते म्हणालेत.
हेही वाचा - राज्यात सोमवारी 8 हजार 744 नवे कोरोनाबाधित; 22 रुग्णांचा मृत्यू