नागपूर - आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांचा अमरावतीचे पोलीस आयुक्त आरती सिंग, ( Ravi Rana serious allegations against Police Commissioner Aarti Singh ) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हाव गंभीर आरोप ( Uddhav Thackeray serious allegations of Ravi Rana ) केले आहेत. आरती सिंग अमरावतीतून दर महिन्याला सात कोटींची अवैध वसुली ( Illegal collection of seven crores per month ) करून त्यातील पैसा ठाकरेंपर्यंत पोहोचवत होते असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते.
एकसूत्री कार्यक्रम राबवण्यात आला - महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi Govt ) अस्तित्वात राज्यात असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडून अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग ( Amravati Police Commissioner Aarti Singh ) यांना एकसूत्री कार्यक्रम देण्यात आला होता. राणा दांपत्यावर जेवढे गुन्हे दाखल करता येईल तेवढे खोटे गुन्हे दाखल करा असे निर्देश दिले होते. आरती सिंग यांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मनपा आयुक्त यांच्यावर जेव्हा शिवप्रेमींनी शाई फेक केली, तेव्हा मी अमरावतीत उपस्थित नसताना देखील माझ्यावर 307, 353 कलमान्वय गंभीर गुन्हे दाखल केले. जेव्हा शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला तेव्हा, माझ्या घरी मोठ्या प्रमाणावर पोलीस पाठवून मला दोन दिवस नजरकैदेत ठेवले. अनेक कार्यकर्त्यांवर तडीपाडीचे आदेश दिले. आरती सिंग यांनी अत्यंत गंभीर कोल्हे हत्या प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.
पोलीस आयुक्त आरती सिंगवर केले गंभीर आरोप - आरती सिंग यांनी अमरावतीमध्ये वसुली पथक नेमले होते. त्यामुळेच अमरावतीत गुन्हे वाढले, दंगल झाल्या. कोल्हे यांची हत्या झाली. आज अमरावतीत रोज गुन्हे होतात,अवैधंदे चालतात, हत्या होत आहेत. आरती सिंग यांनी दर महिन्याला अमरावतीमधून सात कोटी रुपयांची वसुली केली असून त्याच्यातून उद्धव ठाकरे यांना पैसा पोहोचवला असल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे.
अवैध वसुलीला तपास सीआयडीने करावा - आमच्या विरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे आणि आरती सिंग यांनी केलेली अवैध वसुली यासंदर्भात तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे. आमच्याकडे त्या संदर्भात पुरावे आहेत. ऑडिओ क्लिपिंग आहेत आम्ही योग्य वेळी ती सीआयडीकडे देऊ असे देखील राणा म्हणाले.